Get it on Google Play
Download on the App Store

आकड्यांची तुलना

नुसत्या केसेस आणि डेथ, एवढंच पाहण्यात शहाणपण नाही. त्यासाठी किती टेस्ट्स झाल्यात हे देखील पाहणं गरजेचं आहे.

हा आकडा आहे २० मार्चपर्यंतचा.

• चायनाने केल्या आतापर्यंत  ३,२०,००० टेस्ट्स, त्यात ८०,००० आसपास केसेस त्यांना आढळल्या.

• इटलीने केल्या आतापर्यंत  २,०६,००० टेस्ट्स, त्यात ६०,००० आसपास  केसेस त्यांना आढळल्या.

• अमेरिकेने केल्या आतापर्यंत  १,००,००० टेस्ट्स, त्यात ५०,००० आसपास केसेस त्यांना आढळल्या.

• जर्मनीने केल्या आतापर्यंत  १,६७,००० टेस्ट्स, त्यात ३०,००० आसपास केसेस त्यांना आढळल्या.

• इंग्लंडने केल्यात आतापर्यंत  ६४,००० टेस्ट्स, त्यात ७,००० आसपास केसेस त्यांना आढळल्या.

• ऑस्ट्रेलियाने आजपर्यंत (२५ मार्च)  टोटल टेस्ट्स केल्यात १,६०,००० (एक लाख साठ हजार) आणि केसेस आहेत २४००. त्यात डेथ - ९.

भारताने आजपर्यंत (२५ मार्च)  टोटल टेस्ट्स केल्यात १५,००० (पंधरा हजार) आणि केसेस आहेत ५६२. त्यात डेथ - १०.

तर आतापर्यंत फक्त १५,००० टेस्ट्स झाल्यात. हा नंबर अगदीच मामुली आहे, जर इतर देशांची तुलना केली तर. त्यांचे लाखांत टेस्ट्स झाल्या आहेत.
जाहीर आहे कि जेवढ्या जास्त टेस्ट्स करणार, तेवढया केसेस वाढण्याची शक्यता आहे.
म्हणजे जर नुसतं भारत आणि ऑस्ट्रेलियाची तुलना केली, तर ऑस्ट्रेलियात १० पटीने जास्त टेस्ट्स झाल्यात.

ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या किती ? तर "२.५ करोड", आणि भारताची लोकसंख्या किती ? तर "१३० करोड"

१३० करोड लोकांच्या देशासाठी झाल्यात फक्त १५,००० टेस्ट्स, आणि
२.५ करोड जनतेसाठी १,६०,००० टेस्ट्स....

कळतोय का फरक ?
-------------------------

इतर देशांना पूर्ण लोकडाऊन करणं अवघड जातंय, कारण अर्थव्यवस्था प्रचंड ढासळतेय. अजून ऑस्ट्रेलियाने पूर्ण लोकडाऊन केलं नाही, टप्प्या-टप्प्यात काम चालू आहे.

भारतासारख्या देशाची, खरंतर अजून २१ दिवस लॉक-डाऊनची बिलकुल तयारी नाही, अर्थव्यवस्थेच्या तुलनेत ते भारताला परवडणारं नाही. पण तरी भारताने हा निर्णय घेतलाय, कारण भारताला, 'आपण किती टेस्ट्स करतोय आणि येत्या काळात किती करू शकतो, आपल्याकडे किती बेड आहेत, किती व्हेन्टिलेटर्स आहेत', याची पूर्ण खबर आहे. त्यामुळे कशाही प्रकारे हा नंबर जमेल तसं रोखण्यासाठी भारताने या स्टेप्स घेतल्यात. याचा भारताला आर्थिक फटका बसणारच बसणार आहे.... (अर्थत सगळ्याच देशांना)

पुन्हा एकदा, २१ दिवस देश बंद ठेवणं, ही खायची गोष्ट नाही. भारतासारख्या गरीब देशाला ते झेपणारं नाही. पण युरोपातल्या लोकांसारखी आपली अवस्था होऊ नये, जनावरांसारखं रस्त्यावर तुमची प्रेतं दिसू नयेत, म्हणून हा कठोर निर्णय भारताला घ्यावा लागलाय. त्याचा आदर करा आणि तशी कृती करा.

त्यामुळे जमिनीवर या, आणि 'आम्हाला काही होत नाही', या खुळचट कल्पनेतून बाहेर या.

पुन्हा एकदा,  हे घाबरवण्यासाठी नाही, तर निष्काळजीपणे वागू नये म्हणून ही तुलना सांगितली आहे.