Android app on Google Play

 

स्वभाषेची अभिवृद्धी, आपले योगदान...

 


लोकमान्य टिळकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या एका भाषणात सांगितलं होतं की, भाषेच्या अभिवृद्धीसाठी आपल्या भाषेतील बांधवांचा जो गैरसमज आहे की इतर भाषाच केवळ अभ्युदयाचे साधन आहेत व मराठी नाही हे प्रथम दूर व्हायला हवं.  आईचं मुलं दाईच्या दुधावर वाढलं तर त्याला आईच्या दुधाची किंमत राहत नाही!

जोपर्यंत भाषा ही शिक्षण, व्यवहार आणि व्यापारात येणार नाही तोपर्यंत भाषेचा विकास होणार नाही.

खर तर आपली मायबोली मराठी भाषा ही कुठेच कमी  नाही. आपल्या मराठी भाषेत भरपूर शब्दसंपत्ती आहे, विपुल प्रमाणात साहित्य आहे. परंतु गेल्या काही दशकात आपण आपल्या भाषेच्या विकासाडे लक्षच दिले नाही. ज्याप्रमाणे दक्षिण भारतातील बांधव त्यांच्या भाषेविषयी आग्रही असतात तसा आग्रह आपण धरलाच नाही, यामुळे आता आपली मराठी भाषा आता शिक्षण, व्यवहार व्यापार, मनोरंजन आशा सर्वच क्षेत्रातून कमी होत चालली आहे

हीच वेळ आहे आपण जागे होण्याची!

तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण त्यासाठी काय करू शकतो सगळं सरकारच्या हातात आहे तर असं काही नाही, आपणच खूप काही करू शकतो आणि मग सरकारला देखील व इतरांना देखील आपला हक्क, अधिकार द्यावं लागेल, पण त्यासाठी आपल्याला देखील काही कर्तव्य पार पाडवी लागतील.

आपल्या मराठी भाषेसाठी आपण काय करू शकतो?


*आग्रह मराठीचा, सन्मान मायबोलीचा!*


१)सर्वप्रथम आपण हा गैरसमज दूर करायला हवा की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे व तिला नाकारणं म्हणजे राष्ट्राचा अपमान होतोय असे समझणेच मुळात चुकीचे आहे. 

आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल की भारतीय संविधाना नुसार भारतात एकूण २२ अधिकृत भाषा ज्यात आपली मराठी भाषा देखील आहे आणि आपल्या देशात राष्ट्रीय भाषेची तरतूद नाही सर्व भाषा समान आहेत! आणि आपण काही हिंदीचा द्वेष करत नाही तर हिंदीला विरोध करून हिंदी ऐवजी आपल्या भाषेत सेवा मागतोय जो की आपला हक्क आहे त्यात काही चूक नाही! आणि हिंदीला विरोध करण्याचं कारण एकच आहे हिंदीमुळे कित्येक सेवा मराठीत मिळत नाहीत.


२)ज्या त्या राज्यातील लोकांना त्या राज्यभाषेत सेवा मिळणं हा त्यांचा हक्क आहे त्यामुळे महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे त्यामुळे मागराष्ट्रात मराठीत सेवा मिळणे हा आपला हक्क आहे आणि त्यासाठी मागणी करणं हे आपलं कर्तव्य आहे.

३)महाराष्ट्रात जिथे जिथे मराठीत सेवा मिळत नाही जसे की बँक, रेल्वे, विमा कार्यालय, शासकीय कार्यालये तर त्यासंदर्भात तक्रार करा.


४)ग्राहक सेवा प्रतिनिधींचा कॉल येताच मराठीतून बोलण्याचा आग्रह धरा आणि याचा आणखी एक फायदा होईल तो म्हणजे तुमची फसवणूक देखील होणार नाही कारण आजकाल फसवणूक करणारे जे काही कॉल येतात ते उत्तर प्रदेश, बिहार,मध्य प्रदेश अशा राज्यांतून  येतात व तुम्ही जर मराठीतुन बोलाल तर तुमची फसवणूक होणात नाही!


५)आपल्या मुलांना मराठी माध्यमात शिकवा तुम्ही जर पाहिलं तर सर्व क्षेत्रात ज्यांनी उज्वल यश संपादन केलं आहे त्यांचं शिक्षण हे मातृभाषेतूनच झालेलं आहे, मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने संकल्पना या अधिक उत्तम रीतीने स्पष्ट होतात व इतर भाषांप्रमाणे केवळ घोकंपट्टी करावी लागत नाही.


६)मनोरंजन फक्त मराठी

मुलांच्या कार्टुन वाहिन्या, डिस्कव्हरी नॅशनल जिओग्राफी सारख्या माहिती ज्ञान देणाऱ्या वाहिन्या हिंदीतुन पाहणे बंद करा व मराठीतून सेवा देण्यासाठी त्यांच्याकडे आग्रह करा आज या वाहिन्या कन्नड, तेलगू तमिळ भाषेत सेवा देतात पण वरील भाषिकांहून अधिक लोकसंख्या असून देखील मराठीत सेवा देत नाहीत कारण काय? तर आपल्याला हिंदी चालते, त्यामुळे हिंदीत या वाहिन्या पाहणे बंद करा व मराठीतून सेवा देण्यासाठी मागणी करा! (सोनी याय ही कार्टुन वाहिनी मराठी भाषेत उपलब्ध आहे तिचा अधिकाधिक मराठी बांधवांनी लाभ घ्या जेणेकरुन ही सेवा अशीच सुरू राहिल, कारण काही वर्षांपूर्वी हिस्टरी टिव्ही १८ यांनी मराठी भाषेत सेवा उपलब्ध करून दिली होती. परंतु मराठी प्रेक्षकांचा लाभलेला कमी प्रतिसाद यामुळे त्यांनी हे काम थांबवलं! त्यामुळे हिंदी चालत ही मानसिकता बदला!

७)संभाषण सुरू करताना मराठीतुन सुरवात करा, तुम्ही आग्रह धरला तर समोरील अमराठी व्यक्ती देखील येईल तस मराठीत बोलेल


८)सर्व व्यावसायिकांकडे, व्यवसायिकांकडे, सेवा पुरविणाऱ्याकांडे माहितीपत्रक,जाहिरात,ग्राहक सेवा प्रतिनिधी या सेवांची मराठीतून मागणी करा!


९) दुकानावरील पाट्या देखील मराठीत करणे गरजेचे आहे. आतापर्यंत आपण मराठी भाषा सगळ्यांना समजत नाही ह्या कारणास्तव पर्यायी भाषा म्हणुन हिंदी किंवा इंग्रजी ह्या भाषेचा वापर केला. पण ह्या वापरामुळे मराठी भाषेचा वापराचा दर्जा कमी झाला. 

उदा ● तुम्ही कधी कर्नाटकमध्ये गेला असाल तर किंवा भविष्यकाळात कधी गेला तर तिथे तुमच्या पाहण्यात येईल की, तेथील सगळ्या पाट्या कन्नड भाषेतच दिसतील. पर्यायी भाषा त्यांनी कोणतीच वापरलेली नाही. म्हणजेच काय तर त्यांनी त्यांच्या मातृभाषेबद्दल धरलेला आग्रह . कृपया ही माहिती अधिकाधिक मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा...


आशिष अरुण कर्ले.

९७६५२६२९२६

ashishkarle101@gmail.com

#मी मराठी एकीकरण समिती

#मराठी बोला चळवळ