Get it on Google Play
Download on the App Store

डॉक्टरांनी थोडं समजून घ्यावे

डॉक्टरांनी थोडं समजून घ्याव


नमस्कार डॉक्टर!

मी एक फार्मसिस्ट आहे

सर्वच डॉक्टर वाईट असतात असं माझं म्हणणं नाही पण बरेच डॉक्टर लाभासाठी आपली नैतिकता विसरतात.

वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉक्टर नर्स आणि फार्मसिस्ट व इतर व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला लोकांना सामाजिक सेवा पुरवण्याची संधी मिळते पण बरेच डॉक्टर अधिक नफा मिळवण्यासाठी प्रमाणाबाहेर सेवा शुल्क आकारतात. आपल्या व्यावसायिक नैतिक मूल्यांनुसार अस करणं बरोबर नाही.

कमीत कमी व्यावसायिक शुल्क आकारून अधिक अधिक चांगली आरोग्यविषयक सेवा पुरवणं हे आपलं काम आहे, रुग्णाचे आरोग्य याच गोष्टीला आपण प्रथम प्राधान्य द्यायला हवं आणि आणि रुग्णाचे आरोग्य याच गोष्टीला केंद्रस्थानी ठेवून काम करायला पाहिजे.

मी पुन्हा सांगतो की सर्वच डॉक्टर वाईट नसतात पण बरेच डॉक्टर आर्थिक लाभासाठी रुग्णांची लूट करतात.

मला असं वाटत की वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या आपण सर्वांनी म्हणजेच डॉक्टर, फार्मासिस्ट, नर्स आणि इतर व्यवसायिकांनी एकत्र येऊन रुगणां सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी कार्य करायला हवं.

आज आपल्या समोर किती उदाहरणे आहेय आहेत की ज्यांनी आपल्या प्रोफेशन चा वापर लोकांना चांगली सामाजिक आणि आरोग्यविषयक सेवा देण्यासाठी केला जस की डॉक्टर प्रकाश बाबा आमटे.

शिवाय व्यावसायिक नैतिक मूल्यांद्वारे काम करूनही आपण आर्थिक लाभ मिळवू शकतो त्यासाठी रुग्णांची फसवणूक करण्याची गरज नाही....


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे (नवी मुंबई).

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६