इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे का?
हरे कृष्ण
*इतर ग्रहावर जीवसृष्टी आहे का?*
हा प्रश्न काही नवीन नाही पण नासाने २० असे ग्रह शोधले आहेत जिथे जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. आज ही बातमी वाचताच या विषयावर लेख लिहायचा मोह आवरला नाही. मी जे काही लिहिलं आहे ते सर्व प्रभूपदांचे विचार आणि तत्वज्ञान आहे.
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे संथापक श्री श्रीमद ए सी भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी ५० वर्षांपूर्वी त्यांच्या प्रभात भ्रमणावेळी शास्त्रज्ञ, विचारवंत यांच्याशी चर्चा करताना इतर ग्रहांवर देखील जीवसृष्टी आहे हा मुद्दा स्पष्ट केला होता. इतर ग्रहांवरही जीवसृष्टी हा सिद्धांत हजारो वर्षांपूर्वी आपल्या वैदिक साहित्यात मांडला आहे. आपण फक्त आपल्या मानवी शरीराच्या गरजांशी तुलना करून इतर ग्रहांवर जीवनमान आहे किंवा नाही याचा तर्क लावत आहोत. पण प्रत्येक ठिकाणच्या परिस्थतील अनुसरून वेगवेगळी जीवसृष्टी अस्तित्वात असते. वाळवंटी भागात कमी पाण्यावर जगणारे जीव वनस्पती असतात,ध्रुवीय ओरदेशात दाट केस असणारे प्राणी असतात त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रहावर त्या त्या परिस्थितीला अनुसरून जीवसृष्टी अस्तित्वात असते. श्रील प्रभुपाद सांगतात की आपली इंद्रिये ही अपूर्ण आहेत त्यामुळे अपूर्ण इंद्रियांनी केलेले संशोधन ही अपूर्णच असते. सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध लागण्यापूर्वी सुईकग्या टोकावर लाखो सूक्ष्म जीव असतात यावर कोणीही विश्वास ठेवला नसता पण हे सत्य आहे की सुईच्या टोकावरही लाखो सूक्ष्म जीव असतात. जर कोणी म्हणेल की आपल्या डोळ्यांना दिसत नाही म्हणून सूक्ष्म जीवच नाहीत तर तो मूर्खपणा ठरेल. आपल्या डोळयांना ठराविक मर्यादेतच दिसते, कानांना विशिष्ट तीव्रतेचाच ध्वनी ऐकू येतो यावरून कोणालाही सहज लक्षात येईल की आपली इंद्रिये ही अपूर्ण आहेत आणि अशा अपूर्ण इंद्रियांच्या साहाय्याने केलेले संशोधन देखील अपूर्णच असते. त्यामुळे आपल्या या मर्यादित शरीराने आपल्याला परग्रहावर जीवसृष्टी आढळली नाही याचा अर्थ इतर ग्रहांवर जीवसृष्टी नाही असे म्हणणे चुकीचे आहे. आपल्या या ब्रह्मांडातील आकाशगंगेच्या (मिल्की वे दूधगंगा) तुलनेत आपली पृथ्वी एक बिंदूप्रमाणे आहे. अशी कित्येक ब्रम्हांडे आहेत आहेत त्यामध्ये कित्येक आकाशगंगा आणि कित्येक ग्रह आहेत. आपल्याला आपली आकाशगंगा सोडून इतर कित्येक आकाशगंगा, ब्रह्मांड आणि ग्रह याबद्दल काहीच ज्ञान नाही त्यामुळे आपल्या अपूर्ण इंद्रियांवर विश्वास ठेवून इतर ग्रहांवर जीवसृष्टी नाही असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.
अधिक माहितीसाठी जीवन शक्तीचा उगम अंधश्रद्धा निर्मूलन हे प्रभूपदांचे पुस्तक वाचा शिवाय त्यांची इतर अनेक पुस्तके आहेत ज्यामध्ये याबद्दल माहिती मिळेल. इतर ग्रहांचा सुगम प्रवास या पुस्तकातही चांगली माहिती भेटेल. प्रभूपदांनी लिहुलेली भगवद्गीता जशी आहे तशी ही तर जगप्रसिद्ध आहे. जगातील जवळजवळ सर्वच भाषेत तिचे भाषांतर झाले आहे. प्रभूपदांची इतर पुस्तकांबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या इस्कॉन केंद्राला भेट द्या.
धन्यवाद!
जय प्रभुपाद
हरे कृष्ण
आशिष अरुण कर्ले.
९७६५२६२९२६
ashishkarle101@gmail.com