Android app on Google Play

 

मराठी असे आमुची मायबोली...

 

आपल्या भाषेच्या विकासासाठी इतर भाषिकांकडून काही शिकण्यासारखे असेल तर ते जरूर शिकले पाहिजे

इतर भाषिक प्रामुख्याने तमिळ, कन्नड, बंगाली हे भाषिक कार्टुन्स मध्ये यांच्या भाषेचा आग्रह धरतात त्यामुळे हे कार्टून्स त्या त्या भाषेत देखील उपलब्ध आहेत परिणामी मराठी भाषिकांमध्ये असा आग्रह नसल्याने हे कार्टून्स मराठी भाषेत उपलब्ध नाहीत हे दुर्दैव.

लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं की आईच मुलं दाईच्या दुधावर वाढलं तर त्याला आईच्या दुधाची किंमत राहत नाही आणि तीच परिस्थिती आज पाहायला मिळत आहे इंग्रजी आणि हिंदीच्या अतिवापरामुळे मराठी भाषेचा वापर कमी होत आहे


याचा परिणाम असा झाला आहे की कित्येक मुलं जी हे कार्टून्स हिंदी भाषेत बघतात ती मुलं घरी देखील हिंदीमध्ये बोलतात

आमच्या एका नातेवाईकांची लहान मुलगी आहे ती सतत कार्टून्स पहायची आणि हे कार्टून्स हिंदीत पाहण्याचा असा परिणाम झाला की जेंव्हा तिला कोणी मारायचे भीती दाखवायचे तेंव्हा ती वाचवा वाचवा नाही बचाव बचाव अस बोलायची

विनोदाचा भाग सोडला तर ही एक गंभीर समस्या आहे आणि यावर गांभिर्याने विचार करायला पाहिजे


दूसरा मुद्दा असा की भाषेच्या शुद्धीकरणासाठी कित्येक परकीय शब्दांना अनेक पर्ययी मराठी शब्द उपलब्ध आहेत पण आपण ते वापरत नाही हे दुर्दैव


मला असं वाटत की या समस्यांवर उपाय म्हणजे आपण सर्व मराठी भाषा प्रेमींनी या कार्टून्स च्या वहिनींना मराठी भाषेच्या आग्रहाबद्दल पत्र लिहायला हवं आणि दुसऱ्या समस्येवर उपाय म्हणजे आपण अस एखाद अँप, ई पुस्तक बनवलं पाहिजे ज्यामध्ये रोजच्या वापरातील परकीय शब्दांना पर्यायी मराठी शब्द उपलब्ध होतील...


आशिष अरुण कर्ले.

३२ शिराळा (सांगली)