सात लघु लेख - अभिलाषा देशपांडे
(खाली दिलेले सर्व लेख माहितीपर आणि प्रासंगिक आहेत)
डायनोसाँर:
हा प्राणी इतिहासपूर्व काळातील पृथ्वीवर सरपटणारे प्राणी व पक्षी होते. सुमारे १६ कोटी वर्षापूर्वी हे प्राण्यांचे पृथ्वीवर वर्चस्व होते. 9000 पेक्षा अधिक जाती अस्तित्वात असलेल्या डायनोसाँर पैकी काहींमध्ये उडण्याचु क्षमता होती. काही शाकाहारी होते. तर काही मासांहारी ,काही द्विपादी होते तर काही चतुष्पाद. साधारणतः अवाढव्य आकारासाठी विख्यात असणाऱ्या डायनोसाँर पेकी मानवी आकाराचे देखील अनेक प्राणी होते. सुमारे 6.5 कोटी वर्षापूर्वी घडलेल्या एका मोठ्या विनाशचक्रादरम्यान डायनोसाँरचा अस्त झाला. हिंदी महासागरात अफ्रिका खंडाच्या पूर्व किना-याच्या लगत असलेल्या मादागावस्कर या प्रचंड बेटवजा देशांमध्ये आढळलेल्या डायनोसाँरच्या पायांच्या अवशेषावरून डायनोसाँर मासांहारी होते. या कल्पनेला पुष्टी मिळाली आहे. सुमारे 65 लक्ष वर्षापूर्वी पृथ्वीतलावर वावरणा-या डायनोसाँर ना 'बालाऊर बोंडाँक' शास्त्रीय संज्ञेने ओळखण्यात येते. पाय उचलून पावला मार्फत जोरदार प्रहार करण्याच्या क्षमता या जीवांमध्ये होती. डाव्या ,उजव्या पावलांच्या कडेला वक्राकार नख्या असल्याने भक्ष्याला रक्तबंबाळ करून खाणे शक्य होते. बालाऊर बोंडाँक या प्रकारच्या डायनोसोरचे अवशेष उत्तर कँनडा,रोमेनिया , आँस्ट्रिया या देशामध्ये सापडले आहेत. त्यामुळे त्याचा वावर शीत कटिबंधातील प्रदेशात होता असे मानले जाते. भक्ष्यांची संख्या कमी कमी होत राहिल्याने उपासमार, शिकार करण्यासाठी प्रचंड भटकंती इत्यादी कारणांमूळे डायनोसाँर पृथ्वीवरून सुमारे 30 लक्ष वर्षापूर्वी नामशेष झाले असावेत असे मानणारे काही विचार प्रवाह आहेत. जीवाष्म - आशिया, अफ्रिका, युरोप व उत्तर अमेरिका खंडात सापडलेले जीवाश्म अंडी ,सांगाडे व इतरही माहिती यांचे आधारे इतिहासाचे दर्शन होते.
राष्ट्रीय विज्ञान दिवस:
राष्ट्रीय विज्ञान दिवस 1928 मध्ये भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्र शेखर वेंकट रमन यांनी कलकत्ता येथे केलेल्या वैज्ञानिक आविष्कार म्हणजे 'रमण प्रभाव 'यांचा स्मृती दिन म्हणून 28 फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. याचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञान व वैज्ञानिक उपक्रमाबद्दल आकर्षित व सतर्क करण्याचा आहे. विज्ञान दिनाचा इतिहास: भारतामध्ये 28 फेब्रु 1928 हा एक महान दिवस होता. ह्या दिवशी प्रसिद्ध भारतीय भौतिक शास्त्रज्ञ वेंकट रमण द्वारा भारतीय विज्ञान.क्षेञात एक आविष्कार पूर्ण झाला. भविष्यात हा कार्यक्रम नेहमी आठवणीत राहण्यासाठी 1986 मध्ये विज्ञान व तंञज्ञानाचा प्रचारासाठी राष्ट्रीय परिषदेव्दारे भारतात 28 फेबु हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून नामांकन करण्यात आले.
वि.दा.सावकरांच्या पुण्यतिथी निमित्त:
1857 च्या स्वातंत्र्य समरानंतर सशस्त्र क्रांतीचा इतिहास वीर सावरकरांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये त्यांनी दिलेली ती पूर्णाहूती त्यासाठी ज्या यातना सहन केल्या. त्याचा इतिहास जर साक्षीनसता तर पुढील क्रांती घडणे अशक्य होते. सावरकरांचे मुळचे घराणे कोकणचे परशूराम भूमीतील गुहागर विभागतले. छञपती शिवराय व बाजीरावांच्या काळात त्यातील काही घराणी देशावर आली. त्यातीलच सावारकर कुटूंब नाशिक जवळील भगूर येथे स्थिर झाले. सौं. राधाबाई यांनी 4 थ्या मुलाला जन्म दिला. परंतु यांना मातृप्रेमापासून वंचित रहावे लागले. लहानाचे मोठे होत असताना त्यांना लेखन व वक्तृत्व या गुणांचा छंद जडला. एकदा एका वक्तृत्व स्पर्धेची बातमी त्यांना उशिरा समजली. तरीही त्यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला. परंतु भाषण करणाऱ्याचा यादीत त्यांचे नाव शेवटी आले. सर्व स्पर्धकांची भाषणे ऐकताना परिक्षक कंटाळले.अशावेळी सावरकर भाषणासाठी उभे झाले. त्यांच्या बाणेदार विचारांनी ओघळत्या भाषेनी परिक्षकाचा कंटाळा कुठल्या कुठे गेला. त्या स्पर्धेत सावरकराना पहिला क्रमांक मिळाला. ते शिक्षणाकरिता पुढे इंग्लंडला गेले. तेथे शिक्षण चालू असताना देश कार्यात खंड पडू दिला नाही. वयाच्या १६व्या वर्षी सक्रिय राजकारणात ते भाग घेऊ लागले.इंग्लंड तेथे त्यांनी 'अभिनव भारत' ही क्रांती संघटना चालू केली. गावठी पिस्तुले तयार करून मिञांकरवी 21 पिस्तुले भारतात पाठवली. 1857 सहस्ञ उठावाची माहिती व्हावी म्हणून "स्वातंत्र्य समर" हा जवळ जवळ 500 पृष्ठांचा मौलिक ग्रंथ लिहिला. त्यात हिंदू राष्ट्रांच्या दृष्टीकोनातून क्रांती युध्दांचे समीक्षण पूर्णपणे केलेले असल्याने याची परिणिती म्हणजे स्वांतंञ्य यूध्द भडकवण्याची होती. अखेर 26 फेब्रुवारी 1966 रोजी ते काळाच्या पडद्याआड गेले. परंतु त्याच्या साहित्य, ग्रंथ लेख या रूपाने इतिहास कायम आहे, त्याची स्मृती आजही अजरामर आहे. "सागरा प्राण तळमळला" जय हिंद जय भारत!!
मराठी राजभाषा दिन आणि त्याचे महत्त्व:
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी! धर्म ,पंथ,जात एक जाणतो मराठी! एवढया जगात माय मानतो मराठी ! 27 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक मराठी भाषा दिवस,मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन'आशा अनेक नावाने साजरा केला जातो. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्याने 'मराठी भाषा दिन' साजरा करण्याची सुरूवात करण्यात आली. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरच अवर्णनीय असून आपण आणि भविष्यातील पिढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा. म्हणून 'मराठी राजभाषा दिन 'साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. याचे महत्त्व आपण पुढे पाहूयात. 27 फेब्रुवारी या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, जगभरात, देशभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत. तेथे मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. या दरम्यान विविध प्रकारचे मराठी नाटके चिञपट, शास्त्रीय संगीत ,काव्य संमेलन, निबंध ,वक्तृत्व स्पर्धा व मराठी भाषेला उत्तम दिशा देण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी आपलीच दरम्यान आज आपण आपल्या भाषेचा म्हणजे आपल्या मायबोलीचा त्याग करून इंग्रजी भाषेचा अवलंब करित आहोत. इंग्रजी ही काळाची गरज आहे. नक्कीच याबद्दल दुमत नाही, परंतु त्यासाठी आपण मराठीची कास सोडावी,हे मनाला पटणारे नाही. आज आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी पाठवतो, मध्ये मराठी भाषा कशी अवघड आहे. व काना,माञा,उकार व वेलांटीने आम्ही कसे हैराण झालो आहोत, अशा आशयाचे विद्यार्थ्यांच्या व्हिडियो व्हाँटसअपवर व्हायरल करण्यात आले होते. मुलांना मराठीचे ज्ञान योग्य देण्याऐवजी आपण ते व्हिडियो एकमेकांना पाठवून मजा घेत होते. अशा रितीने मराठी भाषा संवर्धन होणार नाही. तरूण मुलांना इंग्रजी सोबत मराठी भाषेचे ज्ञान द्या. मुलांना मराठी शाळेत पाठवा ,जर इंग्रजी शाळेत गेला तर आपल्या विद्यार्थ्यांची दुसरी भाषा मराठी असावी. आपल्या भाषेतील साहित्य वाचायला प्रवृत्त करा हे करताना तुम्ही ते पहिले करित आहेत का ,हे पहा पहिले स्वतः करा नंतर दुसऱ्यामध्ये बदल करायला जा. म्हणून सुरूवात स्वतःच्या घरातून करा. माझ्या मराठी मातीचा , लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोर्यातील शिळा!!
यशवंतराव चव्हाण जन्मदिवस:
यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे विभाजननंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे पाचवे उपमुख्यमंञी होते. परिचय- महाराष्ट्रातील सतारा जिल्ह्याच्या जन्म गाव देवराष्ट्र नावाचे गाव महान नेते मराठा शेतकरी कुटूंबात जन्मलेले 12 मार्च 1913 मध्ये मुंबई विद्यापीठातून राज्यशास्ञ व इतिहास मध्ये पदविधर झाले. आई विठाबाई त्यांचे बंधू ज्ञानदेव यांनी कष्ट करून घर चालवले. यशवंतराव या पुञाने खूप शिकावे ही त्या माऊलीची इच्छा. यशवंतरावांनी शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली. त्यांनी संगीत,भजन-किर्तन याचाही आस्वाद घेतला. ते येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत एस.एम. जोशी यांच्यासारखे नेते तेथे होते. तुरुंगामध्ये राजकीय,सामाजिक विषयावर चर्चा होत. यशवंतरावांना त्या वयातच विचारवंत,साहित्यिक यांच्या ग्रंथासंबंधी आकर्षक वाटू लागले. त्यांनी कोल्हापूरातील राजाराम महाविद्यालयामध्ये असताना त्यांचा व्यासंग वाढवला.ना.सी फडके यांच्यासारखे नामवंत ह्यांचे प्राध्यापक होते. ते बी.ए.एल.एल.बी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 1942 मध्ये स्वातंत्र्य लढ्यात भूमिगत होऊन कार्य केले. 1947 नंतर मंञी ,मुख्यमंत्री नंतर देशाचे संरक्षण मंञी ,गृह,परराष्ट्र व वित्तमंञी पदे सांभाळली. यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 जगाचा निरोप घेतला. यशवंतराव ब्राम्हण ब्राहणेतर चळवळी पासून अलिप्त राहिले. त्यांनी महाराष्ट्रातील सर्वागिण विकासाला प्राधान्य दिले.
कलावस्तू व अवशेषाचे संरक्षण:
प्रस्तावना - वारा, ऊन, पाऊस ,धूळ,आग ,महापूर,भूकंप यासारख्या नैसर्गिक आपतीमूळे तसेच यूध्दासारख्या मानवनिर्मित आपतीमूळे विविध प्रकारची चिञे,धातूचे व मातीचे पुतळे ,स्मारके धातूचे व मातीचे पुतळे ,स्मारके, मंदिर इत्यादी कला वस्तूचा नाश होतो.
ऐतिहासिक आढावा - नैसर्गिक व मानवनिर्मित आपतीमूळे इजिप्शियन ,बाँबेलोनियन सम्राट हामुराबी याने पुरातन कलावस्तू जतन करण्याचा त्यावेळच्या रुढीस कायद्याचे स्वरूप दिले होते. इ.स.पूर्व 550 सुमारास होऊन गेलेल्या बेलशेंझर नावाच्या बाँबेलोनियन राजाने पुरातन अवशेषांसाठी बांधलेले एक खास दालन आढळले. हवेतील धूळीचा विपरीत परिणाम वस्तूवर होतो. संरक्षण करिता वातानुकूल व्यवस्था असणे आवश्यक आहे.
पुरातन वस्तूंचा संग्रह व रक्षण- 18 व्या शतकापासून युरोपात पुरातन वस्तुंचा संग्रह व त्यांचे संरक्षण याविषयी विशेष आवड निर्माण झाली. अशा वस्तू नीट व सुरक्षित राखण्यासाठी संग्रहालये स्थापन झाली. तथापि 19 व्या शतकाच्या अखेरीस व 20 व्या शतकाच्या सुरूवातीस युरोपात आधूनिक व शास्त्रीय पध्दतीचा कार्यासाठी वापर सुरू झाला. पुरातन अवशेषाच्या स्थळी पध्दतशीर उत्खनने होऊ लागली. नाशिवंत वस्तू करिता उदा-बांधकाम.त्यांचे नकाशे तयार करुन,छायाचित्रे घेवून त्यांची नोंद करण्यात येऊ लागली.
भारतातील संरक्षण विषयक प्रयत्न - भारतावर झालेल्या परकीय स्वा-यांमध्ये अनेक ठिकाणाच्या कलावस्तूंची व अवशेष स्थानाची फार मोठी हानी झाली. तथापि त्या काळात अडचणीस तोंड देऊन ठिकठिकाणी सतत जिर्णोध्दाराची कार्ये झालेली आढळतात. अनेक राजे लोकांनी मंदिराचे जिर्णोध्दार करण्याकरिता तसेच त्यांची योग्यप्रकारे देखभाल व्हावी ,म्हणून काही उत्पन्न दान दिल्याचे उल्लेख तत्काळ लेखातून आढळतात. उदा-महाराष्ट्राचे मार्डी इ.स.१२१२) याशिवाय विजयनगरचा राजा कृष्ण देवराय (1509-1529) याने मंदिराच्या जिर्णोध्दाराकरिता एक निधी उभारला होता. या पुढे मोठे स्वरूप प्राप्त झाले असे विविध लेखातून आढळतात.
मंगल पांडे: भारताचा आद्य क्रांतीकारक:
1857 मध्ये भारताच्या 1ल्या स्वातंत्र्य चळवळीत एक महत्त्वाची भूमिका बजावणा-या भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. ते ईस्ट इंडिया कंपनीचे 34वे बंगाल इंफर्टीचे सैनिक होते. मंगल पांडेचा जन्म 19 जुलै 1927 ला झाला. उ. प्रदेशच्या 'बलिया' गावात झाला. त्यांच्या वडलांचे नाव दिवाकर पांडे होते. तसेच आईचे नाव अभैरानी होते. ज्यावेळी 1849साली त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीस सुरुवात केली. त्यावेळी ते 22 वर्षाचे होते. हे बराकपुर सैन्य दलातील बंगालच्या 34 व्या बी.एन.आय तुकडीच्या 5व्या कंपनीत काम करत होते. एवढ्यात शेख पालटू नावाचा शिपाई मंगल पांडेच्या दिशेने येऊ लागला. तो आपल्या पलटनीतील असल्यामुळे तो आपल्याला मदत करायला येत आहे असे पांडेना वाटले. पण तसे नव्हते शेख पालटून पांडेना पाठिमागून विळखा घातला. पांडेनी तो सोडवला. भारत सरकारने 5 आँक्टोबर 1984 रोजी पांडेची प्रतिमा असलेली टपाल टिकीटे जारी केली. व पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर हल्ला केला व नंतर त्यांना फाशी देण्यात आली. त्या जागेवर शहिद मंगल पांडे महाउद्यान नावाच्या एका पार्कची उभारणी बराकपुर येथे करण्यात आली आहे.