Get it on Google Play
Download on the App Store

एक वात्सल्यपूर्ण पिता - प्रिया निकुम

पिता: आज पहिल्यादांच त्याच्याविषयी मांडण्याचा प्रयत्न मनापासून करीत आहे. ही व्यक्ती माझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची आहे. लहानपणापासून ते आत्तापर्यंत जीवनांतील जोडले गेलेले प्रत्येक तास, दिवस त्यांच्यांसोबत जास्त घालवल्यामुळे त्याचं महत्त्व हि त्यामुळे तेवढंच आहे.जर कोणी मला "तुला देव दिसला का?" हा प्रश्न विचारल्यास मी बोट त्याच्याकडेच दाखवून ' हो ' म्हणून सांगते.

आपल्याकडे मुलांना वाढविण्यांत ,त्यांच्यावर संस्कार करण्यांत आईचे नाव साहाजिक पुढे येते. आई नऊ महिने बाळाला पोटांत सांभाळत असली तरीसुध्दां जन्मांच्या आधीपासून ते आयुष्यभर जी व्यक्ती आपल्याला डोक्यांत ठेवते. तिचा मात्र आपल्याला कुठेतरी विसर पडतो. आपल्याला वाढवितांना ते काय काय खस्ता  खातात. ह्यांबद्दल जर देखील उल्लेख कुठेही आढळतं नाही.

त्यांच्यामुळे आईशी एक वेगळी जवळकी निर्माण होऊन तिच्याबद्दल आपल्या मनांत एक वेगळीच भावना निर्माण झालेली असते. म्हणूनच, तिच्यासाठी काहीही आणि केव्हाही काहीपण करायला आपण नेहमीच तयार असतो. आणि मग लेख, कविता, वैगरें अश्या माध्यमांतून  ते ऋण देखील आपण निश्चित व्यक्त करतो. तिने आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाच्या जाणिवेतुन आपली ही  कृती घडतं असते.

हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा ह्या सगळ्यांत एका व्यक्तीला आपण आपल्यासाठी घेतलेल्या त्या अनेक कष्टाच्या जाणिवेचा उल्लेख करायला कुठेतरी मागे पडतो. त्यांच्याशी असलेलं नातं त्यांच्या असलेल्या दराऱ्यामुळे कदाचित मागे रहात असेल असं मला वाटत. ते नातं असतं आपलं आपल्या वडिलांशी. माणसाला ठेच लागल्यावर पटकन ओठांवर "आईssगं "असा शब्द बाहेर पडतो. मात्र मोठी वादळे,आव्हानं पेलतांनाचा प्रसंग आल्यावर बाबाच आठवतो. म्हणजे, अश्यावेळेस एका खंबीर माणसांची आपल्याला साथ असणे आवश्यक असते. त्यामुळेंच प्रत्येकांच्या आयुष्यात कोणत्याही रूपांत आपल्या वडिलांविषयीचे स्थान हे महत्त्वाचे असतेच.

कापसांच्या नाजुक धाग्यांनी  विणुन नात्यांचे महावस्त्र तयार होईपर्यंत ते तुटणार नाही, फाटणार नाही याची दक्षता ही व्यक्ती घेत असते. कारण, ती ह्या कुंटुबातील प्रमुख असते. त्याच्यांच पंखाखांली व्यतित केलेले सर्व दिवस आयुष्यातील सर्वात सुंदर, सुरक्षित आणि स्मरणीय असतात. मोठे होऊन त्यांच्या वर्तुळातुन बाहेर पडायचं म्हटलं की, जगण्याची लढाई सुरु होते आणि तेव्हा जीवनाचा अर्थ उलगडायला लागतो. त्यांच्या असण्यांमुळेच नात्याला पूर्णत्व लाभते. वडिलांचा स्वभाव प्रसंगी रागीट व कणखर असल्याने आई इतकी जवळीक नसेल. पण,त्यांच्या इतकी काळजी घेणाऱ्या व्यक्तीला शोधुनही पर्याय सापडणार नाही. हे देखील तितकंच खरं!

असं म्हणतात की, बाकी कोणाशी नाही पण जगातल्या प्रत्येक वडिलांचं आपल्या मुलीशी एक वेगळंच नातं असत. जरी ते बोलून दाखवत नसले तरी सुध्दा काही भावना ह्या केवळ जाणायच्या असतात. कदाचित, ती मोठी झाल्यावर आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याला सुपूर्त करायचा असतो. म्हणून एखाद्या वेळेला जगातील प्रत्येक वडील आपल्या मुलींबाबत फार  हळवे असतात. आणि म्हणूनच,मुलीचं आणि वडिलांचं हे फार वेगळं असत.

माझ्या देखील वडिलांचं माझ्या आयुष्यात एक वेगळं स्थानं आहे.त्यांचं नावं आहे.बाबा" या दोन अक्षरांच मुल्य मापन केले तर आपल्यासमोर कितीही संपत्ती तसेच कोणतीही मोठी व्यक्ती आली तरी त्यांची या दोन अक्षरांच्या शब्दांशी तुलना करताच येणार नाही.माझे पप्पा त्याचं नावं. श्री. प्रकाश निकुम.

मुळचे नामपूरचे असून देखील त्यांनी त्यांच्या हुशारीच्या जोरांवर तेथुन बाहेर पडून आपली प्रगती केली. आज आंम्ही सगळे जण नाशिक येथे स्थायिक आहोत.आम्ही त्यांची तीन मुलं.गायत्री,सुरज,आणि मी (प्रिया). आम्हांला तिघांना काय हवं न सांगता आधीचं समजत गेल्याने हट्ट काय ? हे  कधी माहितीच नाहिये. माझ्या प्रत्येक निर्णयांत मी त्यांना सामील करून घेते. कोणताही कठीण प्रसंग आला तरी आपण खचायचं नाही. अशी त्यांची शिकवणं असते. त्याच्यांशी निगडीत अश्या काही आठवणी आहेत ज्यामुळे त्याचं आणि माझं नातं फार घट्ट आहे. घरांत मी भावंडांमध्ये सर्वात लहान असल्यामुळे शेंडेफळ म्हणून अगदी लाडाची आहे.  

माझ्या वडिलांशी असलेल्या जवळीक मुळे आणि रोजच्या सहवासामुळे ते कुठे जरी लांब गेले तरीसुद्धा मला फार बैचेन व्हायला लागते. त्यांच्याविना हे घर खूप सुनंसुनं व्हायला होत. कारण काही का असेना ते दोघ घरात असली की, एक प्रकारचा धाक असतो.  सगळी काम वेळच्यावेळी पूर्ण होत असतात.  नाहीतर काय आज कोणी घरात नाही म्हणून काम सगळे रेगाळत पडून राहता. ते घरात नसले की घरातील जिवतपनणाच निघून गेल्यासारखा वाटत.खरंच गंमत असते, ते असतात तेव्हा नाही जाणवत पण, नसले की मात्र रोजचाच दिवस तो सुध्दा खूप मोठ्ठा मोठ्ठा वाटायला लागतो.  ते गावावरून घरी आल्यावर वाटत की , किती दिवसाचा काळ लोटून गेलां  त्यांच्या शिवाय ते दिवस मला खूप खायला उठतात.आज सासरी आल्यानंतर जास्त जाणवत कि,आपण त्यांना खूप त्रास दिला का?खूप हट्ट तर केले नाही ना ?पण, एवढं मात्र खर कि,त्यांच्या सहवासात ते दिवस खूप छान होते.  ज्याप्रमाणे म्हणतात ना प्रत्येक बापाला आपली मुलगी एका राजकन्येपेक्षा कमी वाटत नाही. आणि त्याप्रमाणेच  तो तिला ठेवतो सुद्धा.  माझ्या वडिलांनी देखील मला खरच ठेवलंय.  अजूनही!!!

म्हणूनच, त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या नात्यामुळे  देवाला सांगून ठेवते कीयेणाऱ्या प्रत्येक जन्मांत वडील म्हणून तेच लाभू दे कारण, ते  माझं आभाळ आहे. त्यांच्या  सान्निध्यात जग आहे, त्यांच्यामुळे बाप - मुलगी नात्याला अर्थ आहे!

लेखिका: प्रिया भांबुरे - निकुम, पुणे

मोबाईल: 9890048474

ईमेल: priyanikum@gmail.com

आरंभ: जून २०१९

संपादक
Chapters
आरंभ टीम संपादकीय (जून 2019) आई नावाचं विद्यापीठ - अविनाश हळबे केविन फायगी – अभिषेक ठमके मोहुनिया तुजसंगे - हेमंत बेटावदकर दादामामा: एक प्रसन्न व्यक्तिमत्व - किरण दहीवदकर फॅमिली फार्मसिस्ट - आशिष कर्ले आमच्या वेळेस असं होतं? - निमिष सोनार दुष्काळ: महाराष्ट्राची एक शोकांतिका - मयुर बागुल स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी! - विक्रम अरने मार्कंडा महादेव मंदिर, गडचिरोली - प्रतिक पुरकर नाशिकची त्रिरश्मी लेणी - अजित मुठे आफ्रीका आणि यु.ए.ई ! - अविनाश लोंढे पुलवामा हल्ला- अक्षता दिवटे माहेरची चैत्रगौर - श्रेया गोलिवडेकर रजोनिवृती - अभिलाषा देशपांडे छत्री दिसलीच पाहिजे - भरत उपासनी कथा: अद्वैत - सविता कारंजकर कथा: प्रेमात पडताना (भाग 1)- सत्यजीत भारत बाल कथा: ते दोन अद्वितीय - लेहिनी नायर, मलेशिया शनि ग्रहाचे महत्व – मंजुषा सोनार त्या रात्री मला कोण बरे भेटले? – प्रभाकर पटवर्धन कुठे असेल नागी? - सारिका उबाळे असावे घरकुल आपुले छान - भरत उपासनी आमची आजी म्हणायची! - श्रेया गोलिवडेकर एक वात्सल्यपूर्ण पिता - प्रिया निकुम सात लघु लेख - अभिलाषा देशपांडे कविता: गरिबीतील जीवन - सुवर्णा कांबळे कविता: पोरी पदर तुझा सावर - सुवर्णा कांबळे कविता : तू जीवनात आला आणि असं वाटलं - प्रिया निकुम कविता संग्रह: शारदेय (भाग1) - कपिल नवले चारोळी: दर्शन - सिद्धेश प्रभुगावकर फिल्मी गॉगल: चोरीचा मामला - निमिष सोनार एक विचार: पाकीट - उदय जडिये एक विचार: वाढदिवस - उदय जडिये ग्राफिटी: अविनाश हळबे व्यंगचित्रे: सिद्धेश देवधर त्रिरश्मी लेणी : फोटोग्राफ्स