Get it on Google Play
Download on the App Store

बँगलोर मधील ओरियन मॉल - अक्षता दिवटे

बँगलोर मधील ओरियन मॉल म्हणजे ऑल इन वन शॉपिंग आणि मनोरंजन! दक्षिण भारतातील अग्रगण्य असणाऱ्या मॉल पैकी आणि बंगलोर मध्ये असणाऱ्या फेमस मॉल पैकी एक मॉल म्हणजे ओरियन मॉल.

मॉलची स्थापना 2012 मध्ये झाली असून मॉलला जाण्यासाठी मेट्रो ट्रेनची सुविधा उपलब्ध आहे. सँडल सोप फॅक्टरी या मेट्रो स्टेशनला उतरले की अगदी जवळच ओरियन मॉल आहे.

ओरियन मॉलला बसनेसुद्धा प्रवास करू शकता.  यशवंतपुर पासून जवळच ओरीयन मॉल आहे.

ओरियन मॉलमध्ये पार्किंगची खूप मोठी सुविधा उपलब्ध आहे. हा मॉल जितका बाहेरून दिसायला सुंदर आहे त्यापेक्षा आतून खूप भव्य आणि मोठा आहे. या मॉल मध्ये नॅशनल नाही तर इंटरनॅशनल स्तरावरील कंपनी चे व्यापारी दुकाने आहेत. विविध कंपन्यांच्या मेकअपच्या वस्तू इथे मिळतात.

कपड्यांची शॉपिंग करायची असली किवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करायची असेल तर अरियन मॉलला पर्याय नाही. हा मॉल मला व्यक्तिशः खूप आवडतो कारण म्हणजे इतर मॉल मध्ये कसा दंगा आणि क्राऊड असते ना तसे इथे अजिबात नसते.  शांत आणि रमणीय असलेल्या ओरियन मॉलमध्ये शॉपिंग करण्यासाठी आणि फिल्म प्रमोशन साठी अनेक बॉलीवूड सुपरस्टार्स भेट देत असतात. आतापर्यंत प्रियांका चोप्रा, शाहीद कपूर, दीपिका पदुकोण रणबीर कपूर यांनी ओरियन मॉलला भेट घेऊन फिल्म प्रमोशन पण केले आहे. स्वातंत्र्य दिन, दिवाळी, गणपती, नवीन वर्ष, व्हॅलेंटाइन दिवस किवा मग क्रिसमसच्या दिवशी थीमचे अप्रतीम डेकोरेशन केले जाते.

या मॉल मध्ये गायनाचा कार्यक्रम केला जातो, शिवाय फॅशन वीक प्रोग्रॅम आयोजित केला जातो. विविध कंपन्यांचे प्रदर्शन भरत असते. या मॉल मध्ये एकूण चार मजले आहेत. या चार मजल्या मध्ये शॉपिंग झोन, मल्टिप्लेक्स, फूड झोन, कॅफे, गेम झोन, आहे.  पहिल्या मजल्यावर मोकळी जागा आहे. या जागेत तळे आहे आणि जवळच बसण्यासाठी बेंच आहेत आणि आश्चर्य म्हणजे आजुबाजुला उंच उंच असणाऱ्या इमारती!

इथे तळ्याजवळ कॅफे शॉप आहेत. पुस्तके, बूट, आर्टिफिशियल ज्वेलरी, होम डेकोरेशनचे साहित्य व आणखी खूप प्रकारच्या वस्तूचा समावेश असतो.  एकदा तर लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी काही गायकसुद्धा बोलावले होते.. त्यांनी हिंदी गाणी गायली होती त्या संध्याकाळी या मॉलचे वातावरण खूप प्रसन्न झाले होते.  मॉलची डिझाईन आणि बांधकाम एकदम मस्त आहे. Orion मॉलचे डिझायनर फेमस आर्किटेक्चर H. O. K आहेत. मॉल हा सकाळी 10 वाजता उघडतो आणी रात्री 10 वाजता बंद होतो. एरवी खूप बिझी असणारे लोक वीकेंडला फॅमिली सोबत येथे येतात आणी मस्त मजा करतात.

उंच उंच इमारती बरोबरच येथे असलेले नैसर्गिक सान्निध्य, रमणीय आणि उत्साही असणारे वातावरण लोकांच्या मनाला भावते. लोकांना आकर्षित करण्यासाठी Orion मॉल ची टीम नेहमी तत्पर असते. त्यामुळे हा मॉल माझा फेवरेट मॉल आहे त्यामुळे मी सारखी तिथे जात असते. काय मग तुम्हीही भेट देणार ना या मॉल ला, बँगलोरला आल्यानंतर?

- लेखिका: अक्षता दिवटे, बंगलोर
इमेल: adivate484@gmail.com

आरंभ: मार्च 2019

संपादक
Chapters
आरंभ टीम संपादकीय लडाख ऑन व्हिल्स – अजित मुठे भुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे छायाचित्रे: भुतान ऑन बुलेट - अजित मुठे / नेहा मुठे केरळ टूर - अनुष्का मेहेर भाजे लेणी, लोणावळा - स्नेहल घोलप कोकणातील दुर्गम खडतर प्रवास - प्रभाकर पटवर्धन अशी ही मनाली, खूप खूप भावली - रिता जोहरापूरकर/ वनिता महाजन भावस्पर्शी व्यक्तिचित्र भाग १- किरण दहिवदकर मुसळधार पावसात कोकणाकडे - अमित चाळके पंढरीची वारी: एक अनुभूती! - नवनीत सोनार बंगलोर येथील इस्कॉन मंदिर - अक्षता दिवटे बँगलोर मधील ओरियन मॉल - अक्षता दिवटे म्हैसूर दर्शन - अक्षता दिवटे माझा शॉर्ट दक्षिण भारत प्रवास - निमिष सोनार खिडकी शेजारची जागा - ओमकार बागल मुंबई ते गाव - संकेत मुळगांवकर औषधनिर्माणशास्त्र विषयक कायदे - आशिष कर्ले रेसिपी: चायनीज व्हेज मंचुरियन (ड्राय) - मंजुषा सोनार माझे स्केच - मधुरा दहिवदकर माझे काही व्यंगचित्र - प्रिया भांबुरे (निकुम)