Get it on Google Play
Download on the App Store

आश्विनशुद्धपक्षी अंबा बैस...

आश्विनशुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो । प्रतिपदेपासुन घटस्थापना ती करुनि हो ।
मुलमंत्रजप करुनी भोवतें रक्षक ठेउनि । हो  ब्रह्मविष्णुरुद्र आईचे पुजन करिती हो ॥ १ ॥
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ. ॥
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनि हो । सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो ॥ उदो. ॥ २ ॥
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो । मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो ।
कंठीची पदके कांसे पितांबर पिवळा हो । अष्ठभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ उदो. ॥ ३ ॥
चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो ।  उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणीं हो ॥
पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणी हो ॥ उदो.॥ ४ ॥
पंचमीचे दिवशी  व्रत तें उपांगललिता हो । अर्घ्यपाद्यपीजनें तुजला भवानी स्तविती हो ॥
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो ।आनंदे प्रेम ते आले सद्‌भावें क्रीडतां हो ॥ उदो. ॥ ५ ॥
षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो । घेउनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो ॥
कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफलांचा हो । जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥ उदो.॥ ६ ॥
सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरीहो । तेथें तू नांदसी भोवतें पुष्पें नानापरी हो ॥
जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो । भक्तसंकटी पडतां झेलूनि घेसी वरचे वरी हो ॥ उदो. ॥ ७ ॥
अष्टमीचे दिवशी अष्टभुजां नारायणी हो । सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।
मन माझें मोहिले शरण आलो तुजलागुनी हो । स्त्नपान देऊनि सुखी केले अंत:करणी हो ॥ उदो. ॥ ८ ॥
नवमीचे दिवशीं नवदिवसाचे पारणें हो । सप्तशतीजप होम हवनें सद्‌भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो । आचार्याब्राह्मणां तृप्त केले कृपेकरुनी हो ॥ उदो. ॥ ९ ॥
दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोलंघनी हो । सिंहारुढे दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो ।
शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो । विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो । उदो. ॥ १० ॥

देवी आरती संग्रह

संकलित
Chapters
दुर्गे दुर्घट भारी तुजविण... करवीरपुरवासिनी सुरवरमुनिम... आश्विनशुद्धपक्षी अंबा बैस... जय देवी श्रीदेवी माते । व... जय देवी हरितालिके। सखी पा... जय देवी जगदंबे । संकट देव... अंबे प्रार्थितसें तुजला म... आद्यस्थान तुझे करविरपुर म... आनंदे उदो बोलणें भवानीचा ... जय जय निजादिमाता श्रीलक्ष... मी तूं विरहित हें तूं तें... भूकैलासा ऎसी हे केवल... चित्कळा चिदपा चिच्छक्ती व... अजुनी अंत माते किती पाहसी... आई सगुण हेंचीं ब्रह्... मूळपीठ यमुनागारी । म... ॐ नमो आद्यरूपें । दे... अर्णवसमिप दक्षिणे भा... श्री शारदीय अश्विन-च... सुखसदने शशिवदने अंबे... सौम्यशब्दे उदोकारे व... शिव मनभ्रमर कमलिनी ज... मारुनि कोल्हासुर दैत्य दत्तात्... आवाहन ध्यान निवेदुनि आसन ... हंसाग्रि श्रीचंद्रे रंभाव... भक्ती प्रेमें करुनी आरती ... तुझें स्वरुप पाहता मन माझ... स्वेच्छे ब्रह्म तुं स्फुर... श्वासोच्छ्‌वास अवघा तुझिय... सद्‌गुरु सदय द्विदळी वसतो... जय जयवो जगदंबा अंबा सप्तश... जय जय मायभवानी अंबा तुळजा... स्वेच्छे ब्रह्म तूं कौतुकनट क... उदधीलहरीसि तरंगे । ... जयजय भगवति रुक्मिणि ... कामक्रोधदिक वैरी धूप... दशनख चंद्रालंकृत कोम... यर्हि न सन्नासदपि स्... निर्गुणधामी निर्विकल... चतुराननभयहारिणि भो द... कवण अपराधास्तव जननी ... ओंवाळू आरती । महामाय... वरदे रुचिराधरबिंबे ।... आरती त्रिजगदंबिकेची ... श्रीपति तुझीया योगें... जयति जयति जगदंबे महा... जगतारिणी दु : खहारिण... दक्षिणदेशामाजि एक म्... मंगळागौरी नाम तुझे ।... नसतां मारुत पावक जल ... हर अर्धांगी वससी । ज... जय देवी मंगळागौरी । ... निर्गुण जे होते ते स... जय देवी आद्यरूपे भुव... आरती जनन्मोहिनीची सग... करवीरालय वासिनि मंगल... कोल्हापुरी देवी तूं ... सुरवरदायिनी मुरहरसुख... विडा घ्याहो अंबाबाई ... ओवाळीन वोजा ॥ शिवसहज... जय देवी जय जय दुर्गे... महिषासुरमर्दिनि देवि... जय जय आरती त्रिभुवनम... जय देवी विष्णुकांते ... जय देवी जय देवी जय म... महालक्ष्मी करविर क्ष... शिवयन भ्रमर कमळिणी ज... अनादि आदि माया ब्राह... जय जय दुर्गे माते शा... जय जय परमानंदे महामा... जय जगदंबे सुखकर अंबे... शेजारति ओंवाळूं उन्म... जय देवी जय देवी जय म... दुर्गे अघसंकट दुर्गे... जय जय दीनदयाळे शांते... जय देवी जय देवी जय आ... ओंवाळूं ओंवाळूं आरती... जय अंबे जगदंबे जय जय महाक... आरती ब्रह्मकुमारीला श्री अन्नपूर्णे देवी जयजय... जय देवी श्रीदेवी माते । व... येई हो एकवीरा देवी माझे म... चल चल सखे पुजना । हस्ताश... जय देवी मंगळागौरी । सुव... मागू शाश्वत सौभाग्याप्रति... ओवाळू आरतीला मंगळागौरी तु... सुंदरसावळी तुकुबाई संतांच...