डॉक्युड्रामा
आनंदीबाई जोशी यांच्या संघर्षगाथेवर अंजली कीर्तने यांनी एक डॉक्युड्रामा तयार केला आहे. या लघुपटात दिलीप प्रभावळकर यांनी गोपाळराव जोश्यांची आणि अनुजा बिनीवाले व क्षमा खांडेकर यांनी आनंदीबाईंची भूमिका केली आहे. या लघुपटाला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे.