वैद्यकीय शिक्षण
लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०च दिवस जगू शकला. हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.
गोपाळरावांनी यासंदर्भात अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती, आणि धर्मांतर करणे तर या जोडप्यास मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत . पुढे आनंदीबाईची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित त्यांना भेटलेच. या दोघांना अपेक्षित असेच घडले आणि आनंदीबाईना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी "विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया" मध्ये प्रवेश मिळाला. दरम्यान, नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर या जोडप्याच्या मदतीमुळे सर्व काही पार पडत गेले.
सुरुवातीला तत्कालीन समाजाकडून या कामाला खूप विरोध केला. आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले, आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदु धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे .
आनंदीबाईचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहीर केला.
कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईना एम.डी. ची पदवी मिळाली. एम.डी. साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले . हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. पंडिता रमाबाई होत्या. ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून तिची प्रशंसा केली.
स्वप्न पुरे झाले. आनंदी भारतात परतली. एव्हाना तिला क्षयाची बाधा झाली होती. बोटीवर कुणीही गोर्या डॉक्टरने तिला बिगर- गौरवर्णीय म्हणून उपचार केले नाही. मायदेशी पोहोचल्यानंतर समुद्रोल्लंघन करून आलेली, त्यातून स्त्री म्हणून हिंदू डॉक्टर किंवा वैद्यही तपासून पाहीनात. तिच्या गो-या उघड्या मांड्यांनी...समाज बिथरलाय म्हणे ..
ह्या कवितेला लिहून आज बरोबर वर्ष पूर्ण झाले.whatsapp ग्रुपवर एका कवीने बेंगलोरमधे झालेल्या mob molestationवर ह्या गो-या उघड्या मांड्या आणि पुरुषी शरीराचा सवंग उल्लेख करत एक स्फुट मांडले आणि ते वाचून इतका संताप झाला की रागाच्या भरात हे स्फुट मी अक्षरशः खरडले.
मी पोस्ट केल्यावर अवघ्या दोन तासात मला मुंबईहून बहिणीचा फोन आला अग तुझी कविता तुझ्या नावासकट मला सहा सात ग्रुपवर आलीय..मी चकीत झाले ..कारण कोणतीही लय ,कोणताही नियम डोक्यात न ठेवता हे खरडलेले होते..
मला ह्या कवितेने काय दिले असा विचार करताना अनेक घटना डोळ्यापुढे आहेत
Facebook वरुन अनेक अनोळखी सख्यांनी फोन नं. मागितले.फोन केलेआणि मनसोक्ता चर्चा केल्या.
प्रत्येकीला पटलेली आणि स्वतःची अभिव्यक्ती वाटली हि कविता.मला प्रत्येक फोन अंतर्मुख करत होता.
मुंबई,वाई,कराड,सातारा अगदी गोमेवाडी आटपाडी अशा गावातून नातेवाईकांनी फोन whasapp वरून कवितेवर अगदी कौतुकाचा वर्षाव केला.परदेशस्थ मैत्रिणींनी अमेरिका,इंग्लड जर्मनी येथेही कविता वाचली जातेय असे कळवले.whatsapp आणि FB ने दुनिया जवळ आणून ठेवली आहे हे जाणवले.माझे पानच्याcomments मधे अनेक पुरुष मंडळीही कवितेबद्दल भरभरून बोलली.
माझ्या रागाचेही कौतुक झाले होते.व्यक्त होणे किती प्रभावी असते ह्याचा अनुभव ह्या कवितेतून घेतला.
स्वंयसिद्धा पिंपरी चिंचवड ,साहित्यदीप पुणे,काव्यशिल्प पुणे अश्या अनेक व्यासपीठांवर कविता वाचली आणि कौतुकही झाले. नागपूरमधील जेष्ठ लेखिका ज्योती पुजारी ह्यांनी त्यांच्या आगामी स्त्रीविषयक ग्रंथात कवितेला स्थान घोषित करून खरोखर सन्मानित केले.
रंगसंगत पुणे ह्यांच्या काव्यसंम्मेलनात खरं तर जवळ जवळ सहा - सात महिन्यांनी एक वेगळी कविता घेऊन गेले होते.कीर्ति शिलेदार अध्यक्षस्थानी आणि सत्कारमूर्ती होत्या.कार्यक्रम संपला आणि साधारण माझ्याच वयाची एक महिला माझ्याजवळ आली,सोबत एक चौदा वर्षाची मुलगी.
"तुम्ही नूतन शेटे ना?"
"हो"
"मी तुमचे नाव पेपरमधील जाहिरातीत वाचले आणि आलेय..मला तुमची ती...तिच्या कपड्यांपेक्षा तुझे मन आवर कविता ..खूप आवडलीय."
"Thanks," मी नि:शब्द
"तुम्ही खूप छान लिहिलय हो,आपल्या समाजातल्या प्रत्येक स्त्रीचे शब्द आहेत ते"असे म्हणत म्हणत मला मिठीत घेतले.
अभिव्यक्ती आणि कलास्कत मनाची भेट ..मी भारावले होते..कवितेला सात आठ महिने उलटले होते.जे मला वाटत होते त्याक्षणी सांगणे निव्वळ अवघड..
त्यांनी त्यांच्या लेकीला भेटवले आणि म्हणाल्या तुमच्यासारखा धीटपणा यायला हवा हिच्यात.
पुढे म्हणाल्या मला तुमचा एक फोटो द्याल..मी त्यांचा फोन हातात घेऊन selfi काढली. नाव विचारले पण विसरले..क्षमस्व सखे...
त्यांच्यासारख्या अनेक वाचकांचे मनःपूर्वक आभार ..आज पुन्हा एकदा हि कविता आठवण म्हणून..
कवयित्री नूतन शेटे*
*आरोप......*
तिच्या गो-या उघड्या मांड्यानी
समाज बिथरलाय म्हणे...
पण
अगदी अलिकडेच ऐकलं होत....
चार महिन्याच्या बालिकेच्या मांडयानी
घात केला अशाच कुणा मर्दाचा
जो अजूनही शोधतोय नवे कारण
त्याच्या देहाच्या आसक्तीसाठी....
सात वर्षाची चिमुरडी काका म्हणते
ज्याला...
त्याचाही देह मजबूर होतो तिचे
निरागसत्व बघून....
तेरा वर्षाची शाळकरी मुलगी
युनिफाॅर्म का घालते उगाच
तिलाही पाहून तेच वाटतयं
सभ्य (?)पुरुषांना
माझ्या घरी समीना येते कामाला
बुरखा घालून...नखशिखान्त
नालायक बाई...शरीर झाकून
चेतवते रस्त्यावरल्या
निष्पाप पुरूषी देहांना...नाही का?
साडी नेसून , कुंकू लावून ऑफिसात
जाणारी मीना पण तशीच....
साली ...साडीतून उतू जाते
अन निष्पाप पुरूषांची माती होते
सलवार कुरता,साडी किंवा असो
मिनी स्कर्ट...बाईच असते चवचाल...छपरी, छचोर.. छम्मकछल्लो किंवा आयटम......
अश्लील बोलणारा पुरूष मात्र ठरतो मर्द ....मित्रांमध्ये
पडद्याआडची राणी पद्मिनी
पाहून जो बेइमान झाला तो
अल्लाउद्दिन फिरतो हल्ली
प्रत्येक गाडीवर,सिग्नलला
शेजारी,शाळेत अन... जोहार होतो पद्मिनीचा
सगळीकडेच..
पण माझ्या संवेदनशील मित्रा....
तुझ्या शरीराच्या संवेदना ह्या मेंदूच्या
कह्यात हव्यात...ज्या सांगतील
योग्य जागा योग्य भावनांसाठी
असा मर्द शिकलोय आपण
आपल्या इतिहासाच्या पुस्तकात
ज्याने कब्जात आलेली ,हतबल
सुभेदाराची सून ..आई म्हणून नावाजली
पालखीत बसवून साडीचोळी करवली
त्यालाही होते मर्दाचे शरीर..
अल्लादिन खिलजीसारखेच..किंबहुना
त्याहूनही देखणे
पण मेंदू राजा होता त्या शरीराचा
आणि मनाचा...
म्हणूनच इतिहासाने घेतली दखल
त्याच्या अपरिमित पुरूषत्वाची.
तिने स्वातंत्र्याचा अर्थ लावला असेल तोकडा.. तिच्या कपड्यांइतकाच
पण
तुझी नजर कुठे आहे लक्ष्मणासारखी ....
ज्याने घरातील जानकीची पावलेच पाहीली.
म्हणूनच जाताजाता इतकच सांगेन,मित्रा
तिच्या कपड्यांपेक्षा... तुझे मन आवर
ते जास्त विवस्त्र आहे..मेंदूच्या बंधनाशिवाय.....
नूतन योगेश शेटे