नृत्यनाटिका/नाटक/चरित्रकथन/पुरस्कार
पुण्याच्या सुवर्णा कुलकर्णी या स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर 'परिव्राजक स्वामी विवेकानंद' नावाची नृत्यनाटिका सादर करतात. (इ.स. २०१३)
पुण्यातीलच ज्ञानप्रबोधिनीचा युवक विभाग 'परिव्राजक नरेंद्र' नावाचे दोन अंकी नाटक रंगमंचावर सादर करतो. (इ.स. २०१३)
शंकर अभ्यंकर हे 'स्वामी विवेकानंद' या नावाचा चरित्र कथाकथनाचा कार्यक्रम करतात. (इ.स. २०१३)
पुण्याची स्व-रूपवर्धिनी नावाची संस्था 'स्वामी विवेकानंद मातृभूमी पुरस्कार' या नावाचा पुरस्कार देते. पुरस्कारार्थी : निनाद बेडेकर (२०१३)
विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे ९-१० नोव्हेंबर २०१३ या तारखांना विवेकानंद साहित्य संमेलन भरले होते.
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरचे एक दोन अंकी हिंदी नाटक राधिका क्रिएशन्स ही संस्था सादर करते. संस्थेच्या प्रमुख राधिका देशपांडे, लेखिका शुभांगी भडभडे आणि दिग्दर्शिका सारिका पेंडसे यांनी अनेक राज्यांत फिरून नाटकाचे प्रयोग केले आहेत.१७-७-२०१६ रोजी पुण्यात या नाटकाचा १३९वा प्रयोग झाला. या नाटकात ३४ व्यक्तिरेखा असून एकूण ५० कलावंत काम करतात.
विवेकानंदांच्या जन्म दिवशी महाराष्ट्रातील अनेक संस्था वक्तृत्व स्पर्धा, गीता पठण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी आयोजित करतात. काही ठिकाणी सामुदायिक सूर्यनमस्कारांचा, योगासनांचा कार्यक्रम असतो. विविध शहरात जुलूस निघतात. काही संस्था स्वच्छता अभियान, छायाचित्र प्रदर्शन किंवा प्रश्नोत्तर स्पर्धा यांतला एखादा कार्यक्रम करतात.