ब्रह्म संकल्पना
अद्वैत तत्वज्ञानानुसार ह्या विश्वात एकच गोष्ट सत्य आहे. आणि तिलाच तत्वज्ञानात 'ब्रह्म' म्हटले आहे; बाकी सर्वकाही असत्य असून ते मायेच्या शक्तीने ब्रह्मातून व्यक्त व तयार झाले आहे. परत त्या ब्रह्माप्रत जाऊन पोहोचणे हेच आपले लक्ष्य आहे.