Android app on Google Play

 

डेम्लो संख्या

 

मुंबईत १९२३साली रोज डोंबिवलीपर्यंतचा लोकलचा प्रवास करताना कापरेकरांचे लक्ष वाटेत दिसणाऱ्या आगगाडीच्या डब्यांच्या नंबरांकडे असे. या आकड्यांचा विचार करताना कापरेकरांना एका नवीनच प्रकारच्या संख्यांचा शोध लागला. डोंबिवली स्टेशनच्या नावावरून कापरेकरांनी या संख्यांना डेम्लो संख्या असे नाव दिले.

काही डेम्लो संख्या

१६५, १७६, २५५३, १७७६, ४७७७३, १७७७६, वगैरे. या संख्यांचे तीन हिश्श्यांमध्ये विभागले गेले आहेत. प हा पहिला हिस्सा, श म्हणजे शेवटचा हिस्सा आणि मन म्हणजे मधला हिस्सा. प आणि श ची बेरीज करून जो आकडा येईल तो न वेळा मन मध्ये असतो.
१६५मध्ये १=५=६ म्हणून ६ हा आकडा मधे आला आहे.
१७७७६ मध्ये १=६=७. म्हणून ७ हा आकडा (तीन वेळा) मधे आला आहे.

आणखी डेम्लो संख्या

    ७७७७७७. या डेम्लो संख्येत प=०, श=७, प+श=७, म्हणून प आणि श मधे (पाच वेळा) ७ आला आहे.
    ९८ ७७७७ ६७९. ९८+६७९=७७७. मधे ७ हा आकडा चारदा आला आहे. म्हणून ही डेम्लो संख्या.
    २१ ५५५५ ३४.
    २३६ ९९ ७६३.
    १२४ ३३३३ २०९.
    २४ ५३. या संख्येत मधला आकडा(=७) शून्य वेळा आल्यामुळे गैरहजर आहे. (मन मध्ये न=०)
    १२३४५६५४३२१ या संख्येत प=१२३४५, श=५४३२१, बेरीज प+श=६६६६६. मधला आकडा ६. म्हणून ही डेम्लो संख्या.
    ५२१ ६६ १४५.