कापरेकर संख्या
संख्येच्या वर्गाचे दोन हिस्से केले आणि त्या हिश्श्यांची बेरीज मूळ संख्येइतकीच आली तर त्या मूळ संख्येला कापरेकर संख्या म्हणतात.
उदा० ४५२=२०२५ आणि २०+२५=४५(मूळ संख्या). म्हणून ४५ ही कापरेकर संख्या. ९९९२=९९८००१ आणि ९९८+००१=९९९(मूळ संख्या). म्हणूम ९९९ही कापरेकर संख्या.
१, ९, ४५, ५५, ९९, २९७, ७०३, ९९९ , २२२३, २७२८, ४८७९, ४०५०, ५०५०, ५२९२, ७२७२, ७७७७, ९९९९ , १७३४४, २२२२२, ३८९६२, ७७७७८, ८२५६५, ९५१२१, ९९९९९, १४२८५७, १४८१४९, १८१८१९, १९७११०, २०८४९५, ३१८६८२, ३२९९६७, ३५१३५२, ३५६६४३, ३९०३१३, ४६१५३९, ४६६८३०, ४९९५००, ५००५००, ५३३१७० या सर्व कापरेकर संख्या आहेत.