गोष्ट क्र३ द्राक्षे कडु आहेत
एका जंगलात कोल्हा आणि लांडगा दोघं मित्र असतात एके दिवशी दोघं मिळून फिरायला बाहेर पडतात फिरता फिरता खूप लांब पर्यंत येतात सुर्य डोक्यावर ऊन कडक होते घामाच्या धारा लागल्या होत्या वाटेत एक तळं लागले होते दोघांनी पोट भरुन पाणी पिऊन परत पुढे चालू लागले जाता जाता त्यांना एक द्राक्षाची बाग लागते द्राक्षे भरपूर प्रमाणात लागलेली असतात कोल्हाच्या तोंडाला पाणी सुटतं तो लांडगाला म्हणतो की तु पुढं हो मी येतोच पाठीमागून लांडगा थोडं पुढे गेल्यावर एका झाडाच्या आडोशाला उभे राहून पहात असतो कोल्हा द्राक्षाच्या बागेत जाऊन द्राक्षाची घड तोडण्याचा प्रयत्न करीत असतो पण द्राक्षांची घड काही तोंडाला येत नाहीत तो परत प्रयत्न करतो पण किही करून द्राक्षांची घड काही तोंडाला येत नव्हते तो तीन चार वेळा प्रयत्न केला तरी ती द्राक्षे खाता येत नाही तो दमतो आणि परत आपल्या मार्गाला लागतो हे सर्व लांडगा पाहत असतो कोल्हा लांडगा जवळ येतो दोघं चालू लागतात लांडगा विचारतो की काय रे द्राक्षे खाली का कोल्हा म्हणतो की अरे बाबा द्राक्षे कडु आहेत लांडगा मनातल्या मनात हसत पुढे चालू लागतो काही अंतर चालून गेल्यावर एक डाळींबाची बाग लागते आता लांडग्यांच्या तोंडाला पाणी सुटतं तो कोल्ह्याला म्हणतो की अरे तू हो पुढे मी येतोच पाठीमागून कोल्हा पुढे जात एका बाजूला आडोसाला उभा राहून पाहत असतो लांडगा डाळींबाच्या झाडावर चढून डाळींब तोडण्याचा प्रयत्न करीत पण झाडावर चढता येत नाही तो पण तीन चार वेळा प्रयत्न केला तरी काय उपयोग होत नाही तो पण दमुन आपल्या मार्गाला लागतो हे सर्व कोल्हा पाहत असतो लांडगा कोल्हा जवळ येतो कोल्हा विचारतो की काय रे काय झालं डाळींब खाल्लेली का लांडगा म्हणतो की कसली डाळींब कसलं काय डाळींब कडु आहेत