Get it on Google Play
Download on the App Store

शेराचसव्वाशेर भाग २ पुढे चालू

पहिलवान विचारात पडला की आपली बायको कशी काय मला म्हणाली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठून सर्व आवरून घेतले आणि तो घाईघाईने त्याडोंगराच्या पलीकडे जाऊन पाहतो तर काय एक शेतकरी शेतात शेत नांगर टाकून शेत नांगर होता पण नांगराला बैल जोडलं नव्हतं तर नांगराला पाच वाघ जोडलं गेलं होतं आणि त्यांना मारण्यासाठी हातात चाबूक कशाला होता माहीत आहे का हातात भला मोठा नाग घेऊन तो वाघांच्या पाठीत मारीत होता शेत नांगरुन झाल्यावर तो दोन घागरी भरुन दुध घटा घंटा पिऊन टाकलं हे सर्व पहिलवान पाहत होता तो मनात म्हणाला की खरोखरच हा शेतकरी माझ्या पेक्षा जास्त बलवान आहे बायको म्हणाली ते खरेच आहे तो त्या शेतकऱ्या कडे जाऊन पाय पकडून खरेच तुम्ही माझ्या पेक्षा जास्त बलवान आहात मी आतापर्यंत स्व:ताला बलवान समजत होतो तो शेतकरी म्हणाला की अरे बाबा माझ्या पेक्षा पण जास्त प्रमाणात बलवान आहेत चल तुला दाखवितो ते दोघे शेजारच्या राज्यात जातात  तिथे एक पहिलवान भल्या मोठ्या पलंगावर घोरत झोपला होता चल आपण त्याला जागे करुया ते दोघे दोन चाकू घेऊन पलंगाखाली जाऊन त्या माणसाला खालून बोचू लागले पलंगावर झोपलेला माणूस म्हणतो की अरे काय रे धेकूण किती झालेत चावतात सगळी झोप मोड झाली हे ऐकून पलंगाखालील‌ दोघे एकदम घाबरून जातात ते म्हणतात की चला बाबा लवकर नाहीतर तो आपल्याला धेकणा सारखं मारून टाकेल अशी त्यांची फजेती होते ते जायला निघतात
                                                     क्रमशः

                                                    ‌‌  

बाल गोपाळ साठी कथा संग्रह

Anonymous
Chapters
शेराचसव्वाशेर भाग २ पुढे चालू शेराच सव्वाशेर भाग ३ शेरास सव्वाशेर भाग ४ शेरास सव्वाशेर भाग ५ गोष्ट नंबर दोन ***होते ते बरं होतं गोष्ट क्र३ द्राक्षे कडु आहेत महाभारतातील पांडु राजाला शाप मिळतो वडिलांचा उपदेश गोष्ट क्र ५ लव्ह अंकुश लव्ह अंकुश पुढचा भाग गोष्ट क्र सात ब्रह्मांत्र ब्रम्हांत्र पुढाचा भाग क्र२ ब्रम्हांत्र पुढचा चालू शेराचसव्वाशेर भाग २ पुढे चालू शेराच सव्वाशेर भाग ३ शेरास सव्वाशेर भाग ४ शेरास सव्वाशेर भाग ५ गोष्ट नंबर दोन ***होते ते बरं होतं गोष्ट क्र३ द्राक्षे कडु आहेत महाभारतातील पांडु राजाला शाप मिळतो वडिलांचा उपदेश गोष्ट क्र ५ लव्ह अंकुश लव्ह अंकुश पुढचा भाग गोष्ट क्र सात ब्रह्मांत्र ब्रम्हांत्र पुढाचा भाग क्र२ नशीब आपणच घडवतो पुढील भाग नशीब आपणच घडवितो भाग ३