Android app on Google Play

 

फळलें भाग्य माझें । धन्य ...

 

फळलें भाग्य माझें । धन्य झालों संसारीं ॥
सद्‌गुरु भेटला हो । तेणें धरियेले करीं ॥
पश्चिमें चालवीलें । आत्मस्तुती निर्धारी ॥
त्रिकुटांवरी नांदे देखियेली पंढरी ॥ १ ॥
ते सुख काय सांगूं ॥ वाचे बोलतां न ये ॥
आरतीचेनि गूणे । गेले मीपण माये ॥ धृ. ॥
राउळामाजी जातां । राहे देहअवस्था मन हें उन्मन झालें ॥
नसे बद्धतेची वार्ता ॥ हेतु हा मावळला ॥
शब्दा आली नि:शब्दता ॥ तटस्थ होऊनि ठेलों नीजरूप पाहतां ॥ २ ॥
त्रिगुण गुणाबाई ॥ पूर्ण जळल्या वाती ॥
नवलाव अविनाश ॥ न समाये स्वयंज्योती ॥
पाहतां लक्ष तेथें ॥ हालूं विसरलीं पाती ॥
नातुंडें माझें मन । नाहीं दिवसराती ॥ ३ ॥
आरती विठ्ठलाची । उजळली अंतरी ॥
प्रकाश थोर झाला । सांठवेना अंबरी ॥
रविशशी मावळले । तया तेजमाझारी ॥
वाजती दिव्य वाद्यें । अनुहातें गजरीं ॥ ४ ॥
आनंद सागरांत । प्रेमें दिधली बुडी ॥
लाधलों सौख्य मोठें । नये बोलतां बोली ॥
सदगुरुचेनि संगे । ऎसी आरती केली ॥
निवृत्तीने आनंदाची । तेथें वृत्ती नीमाली ॥ ५ ॥
 

पांडुरंग आरती संग्रह

भगवान दादा
Chapters
युगें अठ्ठावीस विटेवर उभा...
येई हो विठ्ठले माझे माऊली...
विठ्ठला मायबापा । वारीं ...
जय जय कटिकर विठ्ठल चिन्मय...
आरती अनंतभुजा ॥ विठो पंढर...
धन्य दिवस अजि दर्शन संतां...
जगदीश जगदीश देव तुज म्हणत...
ऎसीया पायालागी मंगळ आरती ...
ऎसीया पायालागी मंगळ आरती ...
ओवाळूं आरती माझ्या पंढरीर...
भक्तीचे पोटीं बोध कांकडा ...
ओंवाळूं गे माये विठ्ठल सब...
सुंदर अंगकांती मू...
गावों नाचों विठी करुं तुझ...
पंचदशीचे सारीं पंडितभी भ्...
निर्जरवर स्मरहधर भीमातिरव...
काय तुझा महिमा वर्णूं मी ...
सुकुमार मुखकमल । निजसार न...
पंढरी पुण्यभूमी ॥ दक्षिण ...
जय पांडुरंग देवानंददुमकंप...
फळलें भाग्य माझें । धन्य ...
संत सनकादिक भक्त मिळाले अ...
प्रेम सप्रेम आरती । गोविं...
जय जगज्जननि , विठाबाई । उ...