सुंदर अंगकांती मू...
सुंदर अंगकांती ॥ मूख भाळ सुरेख ॥
बाणली उटि अंगी ॥ टिळा साजिरा रेख ॥
मस्तकी मुगुट कानी ॥ कुंडलतेज फांके ॥
आरक्त दंत हीरे ॥ तैसे शोभले नीके ॥ १ ॥
जय देवा चतुर्भूजा ॥ जय लावण्यतेजा ॥
आरती ओंवाळीन ॥ भवतारीं हो वोजा ॥ धृ. ॥
उदार झुंजार हा ॥ जया वनिती श्रति ॥
परतल्या नेति म्हणती ॥ तया नकळे गति ॥
भाट हे चतुर्मूखें ॥ अनुवाद करिती पांगली साही अठरा ॥
रूप न कळे गती ॥ २ ॥
ऎकोनी रूप ऎंसें ॥ तुजलागी धुंडीती ॥
बोडकें नग्न एक ॥ निराहारचि गाती ।
साधने योग नाना । तपे दारुण किती ॥
सांडिले सूख दिल्हें ॥ संसाराची हो शांती ॥ ३ ॥
भरोनी माजी लोका ॥ तिहिं नांदसी एक ॥
कामिनमिनमोहना ॥ रुप नाम अनेक ॥
नासती नाममात्रें ॥ भवपातक शोक ॥
पाऊले वंदिताती ॥ सिद्ध आणि साधक ॥ ४ ॥
उपमा द्यावयासी ॥ दुजें काय हे तुज ।
सत्वासीं तत्वसार ॥ तूं मूळ झालासी बीज ॥
खेळसी बाळलीला ॥ अवतार सहज ॥
विनवितो दास तुका । कर जोडोनी तुज ॥ ५ ॥