Android app on Google Play

 

काही वाचकांचे स्वानुभव

 

१. मुंबईत काकाच्या घरी आम्ही प्लॅन्चेट सुरु केले. एका ठराविक आत्म्याला बोलावण्याऐवजी कोणी जवळ आहे का असे विचारले. उत्तर होय असे आले आणि शेवटी प्रश्नोत्तरांत तो एक न्हावी होता असे समजले. त्याला काळाची कल्पना नव्हती पण आपले घर ह्याच भागांत होते असे त्याने सांगितले. काकांनी नांतर घरी मोठी शांत घातली आणि त्यानंतर त्याला मुक्ती मिळाली.

२. नाशिकांत म्हसकर गुरुजी नावाचे के निवृत्त शिक्षक ह्यांनी अश्याच प्रकारचा एक बोर्ड शोधला आहे. ते तिथे लोकांचा संवाद आपल्या प्रियजनांशी करून देतात. कधी कधी पोलीस सुद्धा त्यांची मदत घेतात असे ऐकिवात आले.

३. पॉल ब्रॅंटन हे युरोपिअन डॉक्टर स्वतः १००% नास्तिक होते आणि भारतात योगींच्या शोधांत आले. ते मुंबईत ताज मध्ये असताना त्यांची भेट एका इजिप्ती अवलियाशी झाली. त्याकाळचे भारतातील सर्वांत श्रीमंत राजे, उद्योगपती इत्यादी त्यांचा सल्ला घेत. त्या इजिप्ती माणसाने प्लॅन्चेट सारखाच प्रकार ब्रॅंटन ह्यांना दाखवला आणि त्यांना थक्क करून  सोडले. ब्रॅंटन ह्यांना भारतात चमत्कारिक योगी नाही सापडले पण ते स्वतः रमण महर्षी ह्यांचे शिष्य झाले.