Get it on Google Play
Download on the App Store

काय आहे प्लॅन्चेट

या साधनेसाठी एक गुळगुळीत फळी व तिवई यांचा उपयोग करण्यात येतो . तसेच एका कॅरम बोर्ड वर कापूर ठेवून तो पेटवून त्यावर लगेच एक छोटा ग्लास ठेवण्यात येतो . कापराची वात मावळली की तो ग्लास निर्यात (vaccum) होतो . कॅरम बोर्ड च्या चारी बाजूला A पासून Z पर्यंत अक्षरे लिहिलेली असतात . प्रयोगासाठी २-४ मनसे लागतात . त्यातील एका व्यक्तीस मिडिअम असे म्हणतात . सर्वांनी डोळे मिटून त्या ग्लासवर नुसते अलगद बोट ठेवायचे असते . मग मिडिअम कडून कोणाही मृत व्यक्तीच्या आत्म्यास मानाने बोलावण्यात येते . जर वेळाने तो ग्लास हलू लागतो व विशिष्ठ अक्षराकडे जाऊन परत मध्यावर येतो . तेथून तो परत दुसर्या अक्षराकडे जातो . अशा रीतीने ४-५ अक्षरे मिळून एखादे नाव तयार होते . असे झाले म्हणजे , त्या नावाची व्यक्ती प्लानचेटआली असे समजतात . त्यास काहीही प्रश्न विचारण्यात येतात व त्यांनी दिलेली उत्तरे सत्य असतात असे मानले जाते .