प्रस्तावना
प्लॅन्चेट ह्या इंग्रजी शब्दाचा खरा अर्थ आहे एक कोरे नाणे. कोरे म्हणजे ज्यावर अजून काही डिसाईन केला नाही असे नाणे. टांकसाळीत अशी नाणी आधी बनवली जातात आणि नंतर त्यावर नक्षी केली जाते. पण आजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून. आणि हा इंग्रजी शब्द नसून खरे तर फ्रेंच शब्द आहे ज्याचा अर्थ होतो "एक खोडी".
प्लॅन्चेट एक बोर्ड असतो ज्यावर ABCD... आणि आकडे लिहिलेले असतात. त्यावर एक लोखंडी हृदयकार तुकडा ठेवायचा असतो. किमान तीन लोक प्लॅन्चेट करण्यासाठी आवश्यक आहेत. लोखंडी तुकडा सुळसुळीत असणे आवश्यक आहे.