Android app on Google Play

 

घाग्रीचे प्लॅन्चेट

 

या पध्दतीच्या ' प्लांचेट ' या प्रयोग बहुदा आश्विन शुध्द अष्टमीस रात्र केला जातो . या प्रयोगात एका पाटावर थोडे गहू पसरून त्यावर शुध्द पाण्याने भरलेली घागर किंवा कळशी ठेवतात . या कळशीत विड्याची पाच पाने घालून वर एक नारळ ठेवतात . कळशीच्या सर्व बाजूंना हळद – कुन्कुवाची बोटे ओढतात . नंतर तिची पूजा करून तिला माळ घालतात . त्यानंतर तिच्या भोवती तीन चार मनसे बसवतात . ही माणसेआपली बोटे कळशीस टेकतात व एखाद्या देवतेस किंवा मृतात्म्यास आवाहन करतात , नंतर एकजण "आपण आला असाल तर कळशी उजवीकडे वाळू दे " असे शब्द उच्चारतो.

मृतात्मा आला असेल तर " कळशी उजवीकडे वाळू दे , नकारार्थी असेल तर डावीकडे वळू दे " असे म्हणतो .

त्याचप्रमाणे कळशी उजव्या किंवा डाव्या बाजूला वळते व प्रश्नांची उत्तरे मिळवली जातात .