Get it on Google Play
Download on the App Store

माझे अनुभव घेतलेले आणि ऐकलेले: भाग 2

मागील भागात सांगितल्या प्रमाणे मला भूतान मध्ये इंटरेस्ट यायला लागला. सातवीत शाळेत असताना टाइम पास म्हणून वाचनालयात गेलो आणि तिकडे एक पुस्तक सापडले खूप जुने पुस्तक होते अक्षरशः पत्रावळ्या होत्या मुखपृस्ट भयानक होते म्हणून वाचायची इच्छा झाली.पुस्तक वाचून काढले पण मनात एक भुताच्या भीती साठी जागा निर्माण झाली.गावात आल्यावर लोकांचे अनुभव ऐकून तर ती भीती अजूनच वाढत गेली.पण भुतांमधला इंटरेस्ट काही कमी नाही झाला.सातवी नंतर तीन वर्षे मी गावाला नाही गेलो .तीन वर्षांत हा पठ्या मोठा झाला पंख फुटले मला .वाईट व्यसने लागली आता व्यसन म्हणजे फक्त सिगारेट आणि दारूचे आणि ते पण 10वीची परीक्षा झाल्यावर.आता ती वेळ आली पप्पा ऑफिस मधून घरी आले आणि बोलले आपण सगळे गावाला जातो आहोत कोकण रेल्वे ने.कोकण रेलवे नुकतीच चालू झाली होती त्या वर्षी.मी खुश जुन्या मित्राना भेटायचे समुद्रावर खेळायचे मी मस्त स्वप्नात होतो.तो दिवस आला आम्ही सगळे शिवाजी टर्मिनस ला आलो ट्रेन मध्ये बसलो मस्त अनुभव होता .सगळे गावाची चर्चा करत झोपले होते पण मी जागा होतो करण मला त्यांच्या पेक्षा मलाच गावचे वेध जास्त लागले होते.खास करून त्या जागेचे ज्या ठिकाणी लोकांनी अनुभव घेतले होते.विचार करत कधी झोप लागली कळलीच नाही सकाळी आई ने उठवले बोलली आळशी कुठचा ब्यागा उचल कुडाळ स्टेशन येईल 10 मिनिटात.हे ऐकून माझी झोप उडाली सगळा बोजा मी डोअर वर आणून ठेवला. चला आले स्टेशन सगळा बोजा मी आणि पप्पानी खाली उतरवला.आम्हाला घेण्या साठी माझा आतेचा मुलगा गाडी घेऊन आला होता.आम्ही सगळा बोजा गाडीत भरला आणि हे निघालो.कुडाळ रेल्वे स्टेशन ते निवती मेढा हे गाव यात 25 किलो मीटर चे अंतर त्याने अर्ध्या तासात पार केले .
 
 चला आलो घरी घराची साफ सफाई आधीच भावाने करून ठेवली होती.मी घरात न जाता सरळ माझ्या मित्राला भेटायला त्याच्या घरी गेलो.मला बघून जाम खुश झाला कारण त्याला मुंबई मधून निघण्या अगोदर कॉल केला होता कारण पूर्ण वरच्या वाड्यात त्यांच्या घरी टेलिफोन होता.त्याला फक्त एवढेच बोललो की मी येतोय सोय करून ठेव रात्री समुद्रावर मस्ती करूया.त्याने इशारा करून सांगितले की सगळे रेडी आहे.मी त्याच्या घरी सगळ्यांना भेटून माझ्या घरी आलो आणि आई ने बडबडायला सुरुवात केली.काही कळते की नाही तुला अरे घरच्या नातेवाईकांना भेटायचे सोडून तू आधी मित्राला भेटायला गेलास कारट्या. काही न बोलता मी सगळ्यांच्या पाया पडलो.आणि कपडे घेऊन अंघोळीला कुठे जाऊ हा प्रश्न केला तेव्हा पप्पा बोलले विहिरीवर जा.मी जाम खुश झालो कारण ती विहीर होती माझ्या त्याच मित्राची ज्याला मी सगळ्यात पहिला भेटलो.विहिरीवर अंघोळ झाली.मी घरी आलो पेज पिऊन झोपलो संध्याकाळ कधी झाली कळले नाही.मित्र घरी आला होता मला उठवायला.आई ने त्याची विचारपूस केली त्याला चहा दिला.आणि त्याला सांगितले ह्या आमच्या कारट्याला शिस्त लाव.मी मनात बोलत होतो आता आम्ही शिस्तीत मजा करणार.घरातून आम्ही समुद्रावर पोचलो आणि थेट पाण्यात उतरलो खूप मस्ती केली.आता काळोख पडायला लागला होता.पप्पा घरी नव्हते म्हणून माझे फावले कारण ते गावात आल्या आल्या आतेचा घरी तिला भेटायला गेले होते.संध्याकाळचे साडे सात वाजून गेले.सगळीकडे अंधार पसरत होता.मित्राला बोललो अजून काळोख होऊंदे मग सिगारेट ओढूया तेवढ्यात मित्र बोलला सिगारेट गावच्या शाळेत लपवल्या आहेत.त्याला दोन शिव्या घातल्या आणि घराकडे निघलो.घरी जाण्या अगोदर दोघांनी विहिरीवरच अंघोळ करवून घेतली कारण समुद्राच्या पाण्याने आणि घामाने अंग चिकट झाले होते.घरी आलो आणि आई ने अंगाई सुरू केली आलास ये तुझी आरती ओवाळते अरे वाजले किती तिन्ही सांजेला घरी पाहिजेस तर गाव हिंडतोयस.मी काही न बोलता पुन्हा एकदा फ्रेश झालो.घडल्यात बघितले 9.00 वाजले होते.आणि मला सिगारेट चा मुड होत होता.जेऊन झाले 10 वाजले.तेवढ्यात पप्पा पण आले.दमले होते म्हणून जरासेच खाऊन झोपून गेले.
 
मी आई ला सांगितले मी माजरकरांकडे झोपायला जातो आहे आई बोलली जा.सकाळी लवकर ये सोमवार आहे ब्राम्हण देवाच्या देवळात दिवे लावायचे आहेत.मी होकार दिला आणि मित्राच्या घरी निघालो.मित्राच्या घरी झोपायची तयारी चालू होती.मी आणि मित्राने लोट्यावर आमचे अंथरूण घातले.आणि गप्पा मारत बसलो घराच्या पायऱ्यांवर.त्याच्या घरचे सगळे झोपले .आम्ही चेक केले झोपले सगळे आता शाळेकडे कूच करूया.मित्राने आधीच माचीस खिश्यात टाकून ठेवली होती.आता ही शाळा घरापासून अर्ध्या किलोमीटरवर आम्ही 12 वाजता घर सोडले सगळीकडे अंधार एक टॉर्च घेतली होती आम्ही आणि एक काठी कारण कुठले श्वापद आले तर त्याला मारायला.आम्ही त्या भयाण काळोखात चालत होतो.मस्त थंड वारा होता वर आकाश मोकळे होत.समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता.रात किड्यांचा आवाज आणि आम्ही गाणी बोलत बोलत शाळा गाठली.मी त्याला बोललो तुला हीच जागा भेटली का रे सिगारेट लपवायला.तू तुझ्या बागेत पण लपवू शकला असतास.तो बोलला हो लपवली असती पण कोणाला सापडले असते पाकीट तर धुलाई झाली असती.आम्ही पायऱ्या चढून शाळेचा गेट वरून उडया मारून आत आलो.थोडे वर अजून चालत गेलो तिकडे एका बागेतल्या कुंडी मागे त्याने लपवले सिगारेट चे पाकीट काढले.घडाल्यात बघितले पावणे एक झाला होता.शाळेच्या अंगणात बसून आम्ही सिगारेट ची मजा घेत होतो.तेवढ्यात मला तो बोलला तुला माहीत आहे आपल्या शाळेत भूत आहे.हे ऐकून मला ठसका लागला आणि डोळ्यातून पाणी आले त्याला बोललो साला भूत काही नसते असेल तर येईल.

तो बोलला मला पण माहीत आहे रे पण खूप जणांना अनुभव आला आहे इकडे मी बोललो रात्रीचे कोण येते शाळेत मरायला.तो बोलला अरे दुसऱ्या गावातले लोक समुद्रात रात्री मासे पकडायला येतात या खालच्या रोड वरून तेव्हा काही जणांना दिसले होते.मी बोललो भास झाला असेल.आता रात्रीचा सव्वा वाजलेला मित्र बोलला या शाळेत एकाने फाशी लावून घेतली होती आपण बसलो आहे त्याच्या बरोबर मागे मी स्वतः बघायला आलेलो मी मागे वळून बघितलं तर अंगावरून थंड हवेची झुळुक येऊन गेली.मी काही लक्ष दिले नाही पण त्या जागेवरून माझी नजर काही हटत नव्हती.मित्र बोलला काय झाले काय बघतोयस मी बोललो तो दिसतोय मला फाशीला लटकलेला , मित्र घाबरला आणि पाळायला लागला मी बोललो अबे साल्या खरा नाही रे मी इमाजिन करतोय कसा दिसत असेल तेव्हा मित्र बोलला तू येडा आहेस काय.काही इमाजिन करतोस मी बोलो यातच तर थ्रिल आहे.असे बोलून त्याने 3 री सिगारेट लाईट करायला घेतली पण वारा एवढा होता की माचीस पेटतच नव्हती.म्हणून आम्ही बरोबर त्या माणसाने फाशी घेतली होती त्या जागेच्या आडोश्याला जाऊन सिगारेट पेटवली आणि मी वर बघितले तर एक दोर खंड दिसला मी मित्राला बोललो हाच काय तो दोर खंड ज्यावर त्याने स्वतःची मान अडकवली मित्र बोलला आईला हे कुठून आले.असे बोलताच बाजूच्या वर्गातून काही तरी पडल्याचा आवाज आला.माझ्या अंगावर काटा आला मित्र बोलला पळ लवकर आम्ही जीव मुठीत घेऊन पाळायला लागलो तर अजून काही तरी पडल्याचा आवाज झाला.कश्याबश्या आम्ही गेट वरून उडया मारल्या आणि गेट मधून काही दिसते का टॉर्च मारून बघू लागलो तर साल एक कुत्रा त्या वर्गातून बाहेर आला शाळा जुनी होती सो दरवाजे उघडेच असायचे.साला दोघे पण एकमेकांकडे बघून हसायला लागलो.आणि जोक मारत घरी आलो तेव्हा 2 वाजले होते.

सकाळी उठून बसलो दोघे तर घरात चर्चा चालू होती सकाळचे 8 वाजले होते .आम्ही विचारले काय झाले तर म्हणे काल 2.30 च्या दरम्यान बाजूच्या गावच्या माणसाला शाळे जवळ कोणी तरी थांबवले आणि त्याच्या कडे बिडी मागायला लागला तर जेव्हा त्याने त्याचा चेहरा बघितला तेव्हा त्याला तो ओळखीचा वाटला म्हणून त्याने नीट बघितले तर ती फाशी घेतलेली व्यक्ती होती.त्याला बघून तो बेशुद्ध पडला आता हॉस्पिटल मध्ये आहे तापाने फणफण ला आहे म्हणे..आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितले तेवढ्यात त्याची बहीण बोलली तुम्ही दोघे रात्री कुठे होतात.मी वॉश रूम साठी बाहेर आले तर तुम्ही नव्हता मी बोललो आम्ही पण वॉश रूम ला गेलेलो पण माडात. तुम्ही रात्रीचे घरा बाहेर पडू नका.नाहीतर तुम्हाला पण तो भेटेल.हे ऐकून मी घरी आलो आणि फ्रेश होऊन आई बाबा बरोबर ब्राम्हण देवाच्या देवळात गेलो...
 
त्या दिवशी काय झाले याची चर्चा मी आणि मित्राने केली तो तिकडे होता का तो कुत्रा तिकडे कसा आला हा योगायोग होता की काय होते ते काही कळायला मार्ग नव्हता..अजून ही खूप काही सांगायचे आहे पण आता वेळ नाही लिहायला. लवकरच पुढील लिखाणात सांगेन...

( क्रमशः)
रुद्र कुलकर्णी