ती खोली 3
खोली रिकामीच दिसते...पण खोलीत गारठा जाणवतो....कोंदट कुबट वास नाकात असह्य होत असतो....एखादा प्राणी मरून कुजावा असा घाण वासाचा भपकारा येतो...
सुनिता बाई कपाट शोधतात...ईकडे तिकडे शोधतात...एक डायरी टेबलवर पडलेली दिसते...त्या ती ऊचलून घेतात...
वास कसला येतोय हे काही कळतच नसते...
मावशींना केर लादी करायला सांगुन..
बाहेर बसून त्या डायरी वाचू लागतात...
प्रिय सुनिता....
हि डायरी तुझ्या हातात पडेल तेंव्हा कदाचित ह्या जगात मी नसेन....
तुला हा कोणत्यातरी पुस्तकासाठी लेख वाटत असेल....पण विश्वास ठेव ग माझ्यावर हि माझ्या बाबतीत घडलेली सत्य घटना आहे....
जेव्हापासून आपण ह्या घरात रहायलो आलो तेंव्हा पासुन लिखाणाच्या खोलीत काहीतरी विचीत्र घडत होते...सुरवाती पासुन सांगायचे म्हटले तर मी रात्रीचा लिखाण करित होतो...
अचानक पुस्तकांच्या कपाटात भूकंप व्हावा तसे ते हादरू लागले...
नजरे समोरच अंधार पसरत गेला ...
पुस्तकांवर असलेल्या वेगवेगळे चीत्रांचे एक वलय तयार होत गेले... मुखपृष्ठावरील सगळी भयानक चीत्र एकात एक मिसळायला लागले...भयानक चित्राचा एक मोठा गोळा तयार झाला....त्या गोळ्याला असंख्य हात पाय कान डोळे होते....पीवळा प्रकाश सोडत तो गोळा स्वत: भोवती गोल गोल फिरू लागला..खसबस खसबस आवाज ऐकू आला..भीतीने माझ्या तोंडातून हुॅ असा आवाज निघाला..अन् झपकन तो गोळा सेटीखालती गेला...
घाबरत मी सेटी खाली पाहीले पण तिथ कुणीच नव्हते....
भास असावा कि स्वप्न...! मी घामाघूम झालो...पंख्याचा बटन दाबले...पंखा फिरत का नाही बघायला वर पाहिले...पंख्यावर बसलेला तो दिसला ग मला...
२-३ फुटाचे काळ्या सावली सारखचे पण केसाळ शरीर पीवळे डोळे...माझ्याकडे पाहुन हसत होता....
त्या नंतर माझ्या ह्या खोलीतच रहातोय ग तो....
मी जे वागत होतो ते त्याच्या मुळेच....
तो म्हणतोय मीच त्याला ह्या नकारात्मक ,भूताखेताच्या कल्पनेतुन आवाहन केले आहे.
माझ्या तोंडून त्याला पाहुन नकळत जे "हूं" निघालंय..त्याचा त्यानी काढलेला अर्थ आहे कि त्याला ह्या खोलीत रहायची परवानगी आहे...नुसतीच परवानगी रहाण्यापुरताच नाही तर....
तर त्याचा वंश वाढवण्याची पण परवानगी आहे.....
ईतक्यात खोलीतून एक किंचाळी ऐकू येते...
सुनिता बाई धावत खोलीत जातात...
"ताई...सेटी खालचा केर काढायला घेतला...केरसुणीला काहितरी जडसर लागले...म्हणून खेचले तर.....
तर...
आsssssssss करीत मावशी खोली बाहेर पळत सुटल्या....
धडधडत्या काळजाने सुनिताबाईंनी सेटीखालुन अर्धवट खेचलेले काहितरी अजूनी बाहेर खेचले....
डोळे भीतीने पांढरे पडले....
समोर एकही हाड नसलेले रक्त नसलेले फक्त माणसाच्या आकाराच्या मांसाला सदरा लेंगा चढवावा तसे शरीर...किंवा शिकार केलेल्या वाघाचा गालिचा अंथरावा तसेच सतिशराव सेटीखाली पडलेले होते.....ना रक्त, ना हाडे,दिसत होता फक्त चप्पट झालेले शरीर....
सुनिताबाई पण पळत बाहेर येतात...
तोवर घरकाम करणार्या मावशींनी कुणालातरी बोलावून आणलेले असते...ते काका आत जाऊन पाहुन येतात...एव्हाना सगळे आजुबाजुचे जमा होतात...
"ईतके दिवस नवरा घरात मरून पडलाय,ह्या बाईला पत्ता कसा नाही...! अशी कुजबुज सुरू होते...
सुनिता बाईंना तर वेड लागायची पाळी येते....
अहो काल रात्रीच तर एकत्र होतो....!अगदी एका बिछान्यात.....!
आठ तास...फक्त आठ तास मला ते दिसले नाही आहेत...!म्हणजे रात्रभर...फक्त...
डायरीत लिहीलेले सुनिताबाईंना आठवते...
त्यांना गरगरायला लागते...
हि डायरी तुझ्या हातात पडेल...तेव्हा मी ह्या जगात नसेन.....!!!
म्हणजे मग........!!!!!
गेले काही दिवस मी कुणा सोबत एकत्र.....!!
अचानक त्यांनी ८ दिवस लिखाणाला सुट्टी का घेतली...!
"तुच हो म्हणालास..मी फक्त ईथे रहायला आलो नाही आहे...."
वंश....पीढी...वारस...
दिवस राहीले तर????!
कि दिवस रहावेत म्हणूनच....?!
काय जन्माला येईल....??
सुनिताबाई चक्कर येऊन धाडकन जमीनीवर कोसळतात.....!!
दिपाली ओक (कल्याण)