कथा १
नमस्कार मी नेहा कदम, आज मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती घटना माझ्या काकांच्या मित्राबरोबर घडलेली आहे. आणि हि गोष्ट माझ्या काकांनीच आम्हाला सांगितली आहे.
माझे काका पुण्याला रहायला होते, तेव्हा त्यांचा अविनाश म्हणून एक मित्र होता...तेही काकांच्याच कंपनीत एकत्र काम कारायचे....काकांची व त्यांची खुप चांगली मैत्री होती.. त्यांची जॉब शिफ्ट "डे व नाईट"लाही असायची... एकदा त्यांची नाईट शिफ्ट चालू होती .. तेव्हा माझ्या काकांचे मित्र अविनाश यांना त्यांच्या घरून फोन आला कि त्यांच्या वडिलांची तब्येत खुप बिघडली आहे व त्यांना लवकरात लवकर घरी बोलावले होते..कंपनीच्या ठिकाणापासून त्यांचं घर खुप लांब होतं.. व रात्रही झाल्यामुळे घराकडे जाण्यासाठी त्यांना एखादे वाहन मिळणेही मुश्किल होते... त्यांना खुप टेन्शन आलेहोते...त्यांना त्यांच्या वडिलांची खुप काळजी वाटू लागली... मग तेव्हा माझ्या काकांनी त्यांना स्वत:ची बाईक दिली व लवकर निघण्यास सांगितले... अविनाशनी त्यांचे आभार मानले व बाईक घेऊन ते निघाले....सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता..त्यांचं गाव खुप लांब होतं...त्यामुळे त्यांनी रस्त्यात लागणा-या एका शॉर्टकट मार्गाने जायचं ठरवलं....
आणि तो मार्ग जंगलातून जात होता...अविनाश त्या जंगालाच्या मार्गाने निघाले... आजूबाजूला लहान-मोठी झाडे होती, त्यांत मिट्ट काळोख व सगळीकडेभयाण शांतता पसरली होती... बाईकच्यामोटरचा आवाज ती शांतता चिरत जातहोता व हेडलाईटचा उजेड तो अंधार जमेल तेवढाबाजूला सारत पुढे जात होता...अविनाशकाका वेगात बाईक चालवण्याचा प्रयत्न करत होतेकि ... तोच अचानक बाईक बंद पडली...हेडलाईटबंद झाल्याने चारही बाजूंनी काळोखानेत्यांना घेरलं ... जंगलात असल्याने त्यांनाआणखीनच भिती वाटू लागली होती...तरीही मनाचा हिय्या करून त्यांनी बाईककाही अंतर पुढे चालवत आणली.. तोच त्यांनादूरवर किंचीत उजेड दिसू लागला...तिथेकुणीतरी भेटेल असं त्यांना वाटलं व ते हळूहळूचालत त्या ठिकाणी पोहोचले... तिथे एक तंबूठोकलेला होता व त्या तंबूच्या बाहेर काहीमाणसं शेकोटी पेटवून शेकोटी करत बसलेलेत्यांना दिसले....अविनाश काकांना बरं वाटलंकि कुणीतरी माणसं तरी भेटली या जंगलात. मगते त्यांच्याजवळ गेले व आपला प्रॉब्लेम त्यांनासांगितला... तर त्या लोकांनीअविनाशकाकांना तिथे बसायला सांगितले..मग अविनाशकाकाही त्यांच्याबरोबर तिथेबसले...काही वेळानंतर त्या लोकांनीअविनाशकाकांना म्हणाले," तुम्ही तंबूच्या आतजाऊन झोपा, आम्ही जागतो इथे".. मगअविनाशकाका आत तंबूत गेले तर तिथे एक खाटहोती ..अविनाशकाका त्यावर जाऊनझोपले...
त्यानंतर रात्री साधारण ३.०० च्यासुमारास त्यांना जाग आली...बाहेर त्यांनात्या लोकांचा मोठमोठ्याने हसण्याचाआवाज आले, ते मोठमोठ्याने काहीतरी बोलतहोते..एवढ्या रात्री ते लोक एवढ्यामोठमोठ्याने का हसताहेत, ते पहाण्यासाठीअविनाशकाकांनी हळूच तंबूचा पडदा किंचित बाजूला सारला .. तर ते लोक शांत बसलेले होते,कुणीच कुणाशी बोलत न्हवते.. पण.. ते लोक मात्र त्यांचे पाय त्या शेकोटीत ठेऊन बसले होते....तेदृश्य पाहून अविनाशकाका खुप घाबरले त्यांना दरदरून घाम फुटला व ते थरथर कापू लागले... तिथून निघून जाण्यासाठी ते मार्ग शोधू लागले..इतक्यात त्यांना मागून एक आवाज आला वत्यांनी मागे वळून पाहीलं तर मागे त्या खाटेवर एक विचित्र म्हातारी बाई बसलेली होती वतिने तिचं मुंडकं स्वत:च्या मांडीवर ठेवलं होतं...ते मुंडकं जळालेलं होतं.. तरीही तेअविनाशकाकांकडे पाहून हसत होती....तोसगळा प्रकार पाहून भितीनेअविनाशकाकांना भोवळ आली व ते तिथेचबेशुद्ध पडले...
सकाळी जेव्हा त्यांना जाग आलीतेव्हा ते तिथेच एका झाडाखाली झोपलेले होते....व जवळंच बंद पडलेली बाईकही दिसली...त्यांना काहिच कळेनासे झाले कि रात्री जेत्यांनी पाहिलं ते स्वप्न होतं कि खरं...इतक्यात त्यांना एक माणूस दिसला जो तिथे लाकडे गोळा करण्यासाठी आला होता.... मग अविनाशकाका त्याच्याजवळ गेले व त्यालारात्रीचा सगळा प्रसार एका दमात सांगूनट ाकला....मग तो माणूस म्हणाला कि फारपूर्वी या ठिकाणी एका भटक्या जमातीच्या लोकांचा तंबू जळून खाक झाला होता व त्यात त्या तंबूतील सर्व माणसांचाही जळून मृत्यू झाला होता.... आणि हे फक्त त्यांच्याचबाबतीत नाही तर रात्रीच्या वेळी चुकून इथूनजाणा-या अनेकांना हा भयानक अनुभव आलेला होता.. मग अविनाशकाकांनी त्याला ती बंद पडलेली बाईक दाखवली तर त्या माणसाने लगेच ती बाईक त्यांना चालू करून दाखवली तर बईक पटकन स्टार्टही झाली.. हे पाहूनअविनाशकाकांना आश्चर्य वाटले... तर तोमाणूस म्हणाला कि बाईकला काहीच झालेलंनाहिये ... कदाचित काल आमावस्याअसल्यामुळे हा प्रकार घडला असावा....त्यानंतर अविनाशकाका घाईघाईने घरी आले....तोपर्यंत त्यांच्या वडिलांना हॉस्पिटलमधे एडमिट करण्यात आले होते..पणअविनाशकाकांना मात्र सनकून ताप भरला होता ... तेव्हापासून त्यांनी मनाशी पक्कं केलंकि काहीही झालं तरी पुन्हा कधीच चुकूनहीत्या जंगलाच्या वाटेने जायचं नाही....धन्यवाद....