Get it on Google Play
Download on the App Store

ती खोली 1

सतिश पुराणिक...!एक नामदार दमदार प्रतिष्ठीत लेखक....त्यांच्या कितीतरी भयकथा वाचकांनी डोक्यावर ऊचलुन धरल्या...!नुसते स.पु. नाव वाचूनच पुस्तकांचा धडाधड खप होत असे...!

त्यांच्या दारात बरेचसे संपादक येत जात असत..!

ठरलेल्या वेळेतच कथा कादंबरी लिहुन पुर्ण करून देणारच हे त्यांचे वैशीष्ठ्य ...!

आपल्या लिखाणाच्या बळावर...भरपुर पैसा तर त्यांनी कमवलाच पण नाव ही कमावले....!

लेखणी च्या बळावर त्यांनी मोडकळीस आलेला संसार टुमदार बनवला...!

बायकोला चार दागिने घडवले.. अन् आता ते स्वत:च्या नवीन घरात रहायला जाणार होते.

सर्व सुख त्यांच्या पायाशी येत होते...

देवाने एकच कमी मात्र ठेवली...पदरात मुल बाळ न देता,कुस कोरडीच रिकामी ठेवली...!

भयकथा सम्राट म्हणून नावा रूपाला आलेले सतिशराव ह्यांना मुलबाळाची पोकळी आता जाणवेनाशी झाली होती...!

सतत सुचेल ते लिहीत रहायचे व्यसनच जडले जणू...!

भयकथांच्या दुनियेतच कायम गढलेले असायचे..!

विविध प्रकारचे भयावह भूते...हडळी..चेटकिण ह्याचा ते विचार करत असत...कथा कशी थरारक होईल हेच सतत डोक्यात असत....

त्यांची बायको सुनिताबाई,ह्यांना सुरवातीला नवर्याच्या वागण्याचा त्रास व्हायचा पण आता तिनेही त्यांचं वागणे अंगवळणी पाडुन घेतले होते...!

१०बाय १०च्या खोपट्यातुन ते आता मोठ्या घरात रहायला जाणार होते...तिथे त्यांना रात्रीचे निवांत लिहीता येणार होते...

ते सुध्दा..
स्वत:च्या स्वतंत्र लेखणी कक्षात... !!

तिथे बायकोची कटकट नसेल....कोणी आले गेले तरी बाहेर हाॅल मधेच बसतील..
मी माझ्या खोलीचे दार लावले कि मी माझ्याच विश्वात असेन...म्हणून ते फार खुश होते....!

घराचे काम पुर्ण होत आले..

नवीन घरात जायचा दिवस शेवटी आलाच...सामानांचे लावा लाव झाले...!

लेखनाच्या खोलीची आवरा आवर झाली,मोठया लाकडी कपाटात पटकन दिसेल अशी हर प्रकारच्या भयकथेची प्रत्येकी एक एक प्रत करीत बरीच पुस्तके मांडली गेली.

टेबल खुर्ची नाईट लॅप बसवण्यात आला... !

तिथेच कोपर्यात एक व्यक्ती झोपु शकेल असा बेड म्हणजेच सेटी ठेवलेली होती.

लेखनाची खोली छान सजवली गेलीय पण ऊजेड फारच कमी असल्याचे जाणवू लागले.

ह्या खोलीतले वातावरण
एक प्रकारचे कोंदट कुबट आणि थंड असल्यासारखे झाले होते..

लेखनासाठी हि खोली चूकलीच असे त्यांना वाटून गेले...पण आता काय करणार?

किचन,बेडरूम,हाॅल बदलु तर शकणार नव्हतोच...!

हळूहळू नवीन घराची सवय व्हायला लागली...!

दोघंही नवीन घरात रमायला लागले...!

सतिश रावांनी पुन्हा लिखाणाला सुरुवात करायला घेतली....!

लेखणीच्या खोलीतल्या अंधाराची अन गारठ्याची त्यांना सवय व्हायला लागली...!

ईतकी सवय लागावी कि ते दिवस दिवस भरच काय तर रात्र रात्र भर त्या खोलीतच असायचे....!

सुरवातीला सुनीता बाई रागवायच्या चीडायच्या तेंव्हा हे बाहेर पडायचे....!

दोघ मीळुन गप्पा, जेवण, टीव्ही ,जरासे फिरून आले कि ते पुन्हा खोलीत शिरायचे...!

नवीन घरात येऊन ४/५ महिने झाले.सगळे सुरळीत नीट चालू होते.

पण सतिशराव हल्ली जरा विचीत्रच वागु लागले होते....!

सतत नेगीटीव्ह एनर्जी चा विचार करीत असल्यामुळेच असेल कदाचित ,पण नकळत त्यांनी नकारात्मक ऊर्जेलाच आवाहन केले असावे....

सतत दडपणाखाली असल्यासारखे वावरायला लागले,
खोलीतच दिवसरात्र कोंडुन घ्यायला लागले..
जेवायला बोलवायला दार वाजवले तरी "ताट आतच आणून दे" म्हणून दारातूनच ताट आत घ्यायचे नी खरकटे ताट दारातूनच बाहेर सरकवायचे...!अन् धाडकन तोंडावरच दार लावून घेत असत.

ईतकच काय संपादक दारात आले तरी बाहेर पडेनासे झाले होते....

तुमचे लेख तुम्हाला मीळतील असे आतुनच ओरडुन सांगायचे...किंवा फोनवर बोलू म्हणायचे...

तब्बेतिचे कारण सांगुन सुनिता बाई वेळ मारून नेत होत्या.पण कळतच नव्हते नक्की काय झाले आहे.

कधी मध्ये बाहेर आले कि हरवल्या सारखे नुसतेच बसुन रहायचे..विचारलेल्या प्रश्नाची हो, नाही, हमम, तेवढीच ऊत्तरे देत..

त्या खोलीत कुणीच जायचे नाही असे सुनिता बाई व घर काम करणार्या मावशींना पण स्पष्ट सांगुन ठेवले होते त्यांनी...

दिवसातुन सकाळी फक्त एकदाच ते पण त्यांच्या देखरेखीत त्या खोलीची साफ सफाई होत असत...!

ते करीत असताना पण "पटकन कर,तिकडले राहुदे..."पलीकडले ऊद्या कर,"कपाटाच्या कोपऱ्यातले आज राहू दे "तर कधी म्हणत "टेबलाजवळच्या कोपर्यातले राहुदे "तर कधी म्हणत "सेटी खाली वाकु नकोस...राहू दे...छताकडे पाहु नको...असे सतत टोकत रहायचे....

काम करणारी मावशी पण कंटाळून गेली होती....!आणि मनात भीती सुध्दा...

एके दिवशी मावशी त्या खोलीत केर लादी करण्या करीता गेल्या..!

सतिशराव खुर्चीतच बसून होते...डोळ्यावर अतिशय झोप असल्यामुळे ते खुर्चीतच बसून पेंगत होते...आज मावशींना सुचनापण देत नव्हते...म्हणून मावशीपण भरभर काम ऊरकत होत्या...अंधार्या खोलीत दिसेल तसे काम ऊरकत होत्या...टेबलाजवळच सतिशराव खुर्ची जवळ बसले होते त्यामुळे टेबला खालून त्यांना पुसायला जमत नव्हते..साहेब बसल्या बसल्या डुलक्या घेत असल्यामुळे ऊठवणे पण बर वाटत नव्हेतच...टेबल लँपच्या ऊजेडातच आजुबाजुचे काम करत असतानाच...

सुनीताबाई खोलीत डोकावल्या....!
एक कुबट वास नाकात शिरला...अंगावर गारठा जाणवला..

दारासमोरच टेबल असल्यामुळे त्यांची नजर सहज टेबलाखाली गेली...!