बळी-राजा
काळ्या-काळ्या रानामधी
सोन्यावानी पिक आलं
बैलगाडी भरुन सुगीला
धान्य घराकड आलं
बाजारामधी न्हाय भाव त्याला
राञंदिस राबून फळ नाही कष्टाला
घोर लागून राही जीवाला
लावून घेतो फास गळ्याला
निसर्ग पण पाठ फिरवतोय
नाही पडत पाऊस वेळेवर
सरकार माञ पॅकेज देतय
आमचा जीव गेल्यावर
हात जोडून सांगतो तुम्हाला
योग्य भाव द्या शेत-मालाला
नाहीतर जगाचा पोशिंदा उरल फक्त नावाला
जगाची भूक भागवणारा
तोच आज उपाशी झोपतोय
बँकेच हफ्ते फेडण्यासाठी
लाचार होऊन कर्जमाफी मागतोय
खरंतर भीक नकोय कोणाची
साथ आहे काळ्या मातीची
सोन्यावानी पीक काढेन कष्टान
पण जगणार नाही लाचारीनं
स्वप्न आहेत आमच्याबी पोरांची काॅलेजात जाऊन शिकायची
शहरात जाऊन नोकरी करायची
गरीब आई-बाला सांभळण्याची
पण काॅलेजाची फी भरायला
जमीन आमची विकायची
अन् सरकारी नोकरी करणार पोरं बड्या बापाची
विनंती आहे सरकारला
विसरू नको अन्नदात्याला
न्याय हवाय बळीराजाला
जगाच्या पोशिंद्याला........
अभिजीत मस्कर...