Android app on Google Play

 

माझी चिऊ

 

माझी चिऊ


आहे जरा सगळ्यांपेक्षा वेगळी

म्हणूनच माझ्या मनाला


 जरा जास्तच भाळली

सारखी नसतातच सगळे

तिच्यात आहे इतरांपेक्षा 

काहीतरी वेगळे

हेच माझ्या मनाला कळले 

म्हणून न सांगताच माझे मन तिच्याकडे वळले


गोरे-गोरे फुगरे गाल तिचे

जणू वाटतात गुलाबजामून

आणि मोठे- मोठे डोळे तिचे लाजतात मला पाहून


लांब-लांब काळे केस तिचे

जणू शोभते स्वगाॅची अप्सरा

 आणि रसरसले ओठ तिचे म्हणतात मला माझ्याशी 

प्रेमाने बोल जरा 


लांब बाणेदार नाक तिचे जणू चोच पोपटाची

आणि सुंदर कानामधी तिच्या शोभते मासोळी सोन्याची 


गोड-गोड बोलणे तिचे 

जणू कोकिळ गाती गाणी

बोलण्यामधला भाव तिच्या असतो स्वच्छ निमॅळ आणि भावूक जणू वाटते अमृत वाणी 


पाहताच तिला माझे 

हरपून जाते भान 

शोभते माझ्या स्वप्नातील राणी रूपवान 


आहेच तशी माझी चिऊ 

जिचा सगळ्यांनाच वाटावा हेवा

म्हणून मागणे एकच आहे 

तिला नजर कोणाची लागू नये रे देवा