मला आवडतं
मला आवडतं तिला
माझी म्हणायला
कारण मी असतो कायम तिच्यातच हरवलेला
मला आवडतं तिच्याशी बोलायला
कारण मी असो तिच्यातच गुंतलेला
मला आवडतं तिच्याबर फिरायला
कारण तिने माझा हात असतो घट्ट पकडलेला
मला आवडतं तिला भेटायला
कारण मी आसुसलेला असतो तिला घट्ट मिठी मारायला
मला आवडतं तिच्याशी भांडायला
कारण तिचा चेहरा छान दिसतो रूसलेला
मला आवडतं तिची माफी मागायला
कारण मी कधीच बघू शकत नाही तिला रडलेलं