Android app on Google Play

 

संसार माय लेकराचा

 


वाट चालता संसाराची
नाही आधार कुणाचा 
दुभंगलेल्या सपनांना
भिती वाटते अंधाराची

आई-बाप न्हाई जगात
म्हणून लगीन लागलं कोवळ्या वयात
समज नव्हती जगाची 
ऊर दाटून येई काळजात

गाडा ओढता संसाराचा
सोबत नाही साथीदाराची
दु:ख आहे डोंगराएवढे
सुख नाही चिमुटभर

वाट चालता बाजाराची 
साथ नाही धन्याची
दोष सारा नशिबाचा 
श्वास कोंडतो लेकराचा

उगवत्या सुयाॅच्या साथीनं
नवं सपान बघितलंया
कष्ट करून लेकराला 
साळत धाडलंया

नव्या उमेदीनं जगायचं
नाही हारुन चालायाचं
घेतली मशाल हाती लेकराच्या भविष्याची

लेकरू शिकून मोठं होणार
म्हातारपणी आधार देणार
 मायचं सपान पूरं होणार....

   अभिजीत मस्कर...