Get it on Google Play
Download on the App Store

बाळा

खुप शिकून रे बाळा 

गेलास घरापासून लांब

तू झालास मोठा साहेब

पण अजूनही गावाकडं 

वाट बगती तुझं माय- बाप 


तुझ्या जन्मासाठी रे किती सोसल्या होत्या कळा

असा कसा तोडून गेलास 

माय-बापाचा रे लळा


तुझ्या शिक्षणापाई किती 

खटाटोप घेतला

तू शिकावास म्हणून 

चिमटा काढला पोटाला


बाप अजून फेडितो तुझ्या 

शिक्षणाची सावकाराची उसणी

माझ्या अंगची जाता जाईनात दुखणी


शेतामधी राब-राबून मोडलं माझं कंबर 

एकदा येऊन खाऊन जा 

मायच्या हातचं पिठलं भाकर


तू नाहीस तर बाळा 

घरपण नाही रे घराला

पण विसरु नको यायला

दहन द्यायला आमच्या सरणाला


मेल्यावर तर बगावयास 

येऊन जा रे बाळा 

नाहीतर पिंडाला आमच्या 

शिवणार नाही कावळा

शेवटच एकदाच बघायला येरे बाळा........


            अभिजीत मस्कर