Get it on Google Play
Download on the App Store

आनंद मानण्यात आहे

अब्दुल हकीम ( अंबड )

बोलकी लेखणी
9273602397


आनंद मानण्यात असतो बराच काही
नसता मिळून आनंद हा मिळत नाही

चिमुकल्या मुलांच्या आनंदाच्या कल्पना
आपण घ्याव्या उसण्या आपल्या जीवना

"वस्तूच पाहिजे हो" हा अट्टाहास कशाला
'सेल्फी' काढण्या मोबाईल खास कशाला

मी या मुलांकडून शिकतो भरपूर काही
मला वाटून गेले 'आनंद' काही दूर नाही