Get it on Google Play
Download on the App Store

वृद्धाश्रमात

अब्दुल हकीम ( अंबड )

बोलकी लेखणी
9273602397


काय विचार करत असेल आई
जिवंतपणीच मरत असेल आई

येथे वृद्धाश्रमात शेवट आपला
खरेच हो 'घाबरत' असेल आई!

मुलगाच हवा म्हणून नवस केले,
किती उपवास धरत असेल आई

अडीच वर्षे दूध पाजले छातीचे,
सांगा कसे विसरत असेल आई?

मुलांनी तिचे ते उपकार मानता
घरी आलेली परत असेल आई!

कवींनी त्या मुलांना समजवावे,
तमन्ना नक्की करत असेल आई