स्पर्श
कर्तृत्वाच्या पाठीवर कौतुकाचा स्पर्श
पारदर्शी कार्याला असे सत्याचा स्पर्श
थेंबातल्या आभाळाला ओंजळीचा स्पर्श
निष्ठेला हवा असतो विश्वासाचा स्पर्श
जन्माला मिळतो जेंव्हा जीवन स्पर्श
शैशवा ला लाभे प्रेमळ मातृत्वाचा स्पर्श
तारुण्याला हवा मलमली जादुई स्पर्श
मैत्रीला न मागता मिळतो आधाराचा स्पर्श
शब्दांना मिळतो भावनांचा परिस स्पर्श
मंजू ळ स्वरांनी होतो मनाचा मनास स्पर्श
मंजू काणे ©