पण सामान्य पैसा आणि ह्यांत फरक काय ?
आजकाल आपण डेबिट कार्ड, नेट बॅंकिंग वापरतो तेंव्हा ह्या प्रकारच्या चलनाचा फायदा काय असा प्रश्न कुणीही उपस्थित करू शकतो.
बिटकॉईन्स कुठलीही एक संघटना, एक व्यक्ती, एक कंपनी सांभाळत नाही तर लक्षावधी लोक त्याचे मालक आहेत त्यामुळे ती नष्ट करणे मुश्किल आहे. उदाहरणार्थ उद्या समजा एखादे खुद्ध होऊन आपला देश नष्ट झाला तर आपल्या रुपयाची किंमत शून्य होईल ज्या प्रकारे ती इराक, सीरिया मध्ये झाली आहे. पण बिटकॉईन्स मध्ये तसे होऊ शकत नाही. जगातील बलाढ्य राष्ट्रे छोट्या देशांच्या चलनाला सहज नष्ट करू शकतात पण इथे ते शक्य नाही.
महागाई पासून रक्षण
१९४७ साली एक IAS ऑफिसरला महिन्याला ३५० रुपये पगार होता. समजा तो पगार त्याने बॅंक मध्ये ठेवला असता तर ९% चक्रदर वाढीने २००७ मध्ये ते वाढून त्याचे 61,610 होतील. आजकाल IAS ऑफिसर ला तितकाच पगार आहे. थोडक्यांत काय तर मागील ७० वर्षांत रुपयाची किंमत इतके घसरली आहे कि समाज आपण पैसे बॅंकेत ठेवले तर त्याची किंमत कमी कमी होत जाते.
ह्याचे मूळ कारण म्हणजे सरकार आपल्याला गरज पढील तेंव्हा पैसे छापते आणि त्यामुळे पैश्याची किंमत कमी होती. बेजबाबदार राष्ट्रे जशी व्हेनेज्युएलला किंवा झिम्बाबे इथे सरकारे इतका पैसे छापला आहे कि त्यांच्या शाळांची किंमत जवळ जवळ शून्य झाली आहे. व्हेनेझुएला मध्ये तर लोक बिटकॉईन्स वर अवलंबून आहेत.
बिटकॉईन्स मध्ये हि भीती नसते कारण सरकार इत्यादी बिटकॉईन्स छापू शकत नाही. सरकार ची लुडबुड नसल्याने त्यांत भ्रष्टाचार सुद्धा होऊ शकत नाही कारण बिटकॉईन्स ची सर्व देवाण घेवाण गणिती नियमांनी होते.