ब्लॉक चेन
बिटकॉइन ह्या डिजिटल चलनाचा शोध सातोशी ह्या एका रहस्यमयी संशोधकाने लावला. २००८ मध्ये सातोशी नाकामोटो ह्याने एक शोधनिबंध एका ऑनलाईन जर्नल मध्ये पाठवला. त्याचा दर्जा इतका चांगला होता कि तेंव्हापासून त्याने गणिताच्या जगांत खळबळ माजवली. सातोशी ह्याने बिटकॉइन चा मूळ कोड लिहिला आणि तेंव्हा पासून जगातील लक्षावधी लोक बिटकॉइन वापरत आहेत.
ब्लॉक चेन
बिटकॉइन चा गणिती पाया "ब्लॉक चेन" ह्या संकल्पनेत आहे. समजा तुम्ही एक सावकार आहात आणि लोक तुमच्याकडून पैश्यांची देवाण घेवाण करतात. प्रत्येक देवाणघेवाण तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये क्रमाने लिहितात. ह्याला इंग्रजीत लेजर म्हटले जाते. आता विचार करा कि गांवातील प्रत्येक माणूस आपल्या खिशांत एक नोटबुक ठेवतो आणि प्रत्येक पैश्याची देवाणघेवाण त्यात लिहितो. आता तुम्ही पूर्व माणसांची नोटबुक वाचली तर कुणाकडे किती पैसा आहे हे तुमच्या लक्षांत येईल.
समजा गावांत कुणीही खोटारडा माणूस नाही तर तुम्हाला पैसे बरोबर नेण्याची गरज नाही. तुम्ही फक्त नोटबुक नेऊ शकता आणि त्यात तुम्ही किती पैसे कुणाला दिले हे लिहू शकता.
ब्लॉक चेन हि संकल्पना अशीच आहे. इथे प्रत्येक माणूस एक डिजिटल लेजर आपल्याकडे ठेवतो. प्रत्येक लेजर मध्ये जगांतील प्रत्येक बिटकॉइन देवाणघेवाण लिहिली जाते. त्यामुळे कुणाकडे किती बिटकॉईन्स आहेत हे आपण त्या नोटबुक मध्ये पाहू शकतो आणि त्याप्रमाणे देवाण घेवाण केली ती त्यात लिहू शकतो.
हे झाले लेजर पण नक्की बिटकॉइन हे चलन कसे निर्माण होते ते आम्ही पुढील चॅप्टर मध्ये पाहूया.