Android app on Google Play

 

पण सामान्य माणसाने बिटकॉइन कसे वापरावे

 

बिटकॉइन वापरण्यासाठी तुम्हाला त्याचे गणित वगैरे समजायची गरज नाही. तुम्ही स्वतः बिटकॉइन वॉलेट (बटवा) हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून वापरू शकता. काही अंशी हे सॉफ्टवेअर पेटीम किंवा इंटरनेट बॅंकिंग प्रमाणेच असू शकते फरक फक्त इतका आहे कि बिटकॉइन चा मार्केट मधील दर सतत बदलत असतो. Wallet म्हणजे लेजर मधील तुमच्या मालकीच्या बिटकॉईन्स ची माहिती शोधून काढायला लागणारी माहिती असती. तांत्रिक दृष्ट्या हा एक फार मोठा कूटशब्द असतो. तो तुम्ही गुप्त ठेवायला पाहिजे. हा शब्द कुणाला सापडला तर तो माणूस तुमचे कॉईन्स चोरू शकतो. 

समजा तुम्हाला स्वतःला wallet ठेवण्याचे कष्ट नको आहेत तर तुम्ही coinsecure सारख्या ऑनलाईन सर्विसचा लाभ घेऊ शकता. इथे तुम्ही फक्त आपला पासवर्ड ठेवायचा आणि तुमचे wallet सांभाळण्याचे काम हि वेबसाईट करेल. तुम्हाला बिटकॉईन्स विकत घ्यायचे असेल तर स्टॉक मार्केट च्या संकेतस्थळावर तुम्ही ज्या प्रकारे समभाग विकत घेता त्या प्रमाणे आपण बिटकॉईन्स घेऊ शकता. 

पण समजा ते संकेतस्थळ हॅक झाले तर आपले wallet आणि त्यातील बिटकॉईन्स घेऊन हॅकर्स पळून जाऊ शकतात.