बिटकॉईन्स खाणकाम
बिटकॉईन्स खाणकाम
ज्याप्रमाणे लोखंड वगैरे माईन करून शोधले जाते त्याच प्रमाणे डिजिटल खाणकाम करून बिटकॉईन्स निर्माण केले जातात. गणितीय दृष्टया जगांत फक्त २१ दशलक्ष बिटकॉईन्स असू शकतात.
आधीच्या चॅप्टर मध्ये आपण पहिले त्या प्रमाणे कुणीतरी लेजर ठेवले पाहिजे. हे लेजर ठेवण्याचे काम म्हणजेच खाणकाम. दररोज लक्षावधी देवाणघेवाण होतात आणि त्याचा रिकॉर्ड ठेवण्याचे काम हे मायनर लोक करतात. तुम्ही बिटकॉइन वापरत असाल तरलेजर तुम्हीच मेंटेन केले पाहिजे असे नाही. लेजर मायनर्स लोक ठेवतात. लेजर "ब्लॉक्स" चे बनलेले असते. तुम्ही एक ब्लॉक चे लेजर ठेवले तर तुम्हाला भेट म्हणून काही बिटकॉईन्स दिले जातात. दर २१०,००० ब्लॉक निर्माण झाले कि हा भेट दर अर्धा होतो. म्हणजे २०१६ मध्ये एक ब्लॉक ठेवणाऱ्याला १२ बिटकॉईन्स मिळत होते काही कदाचित आणखीन ४ वर्षांनी हाच दर ६ बिटकॉईन्स होईल. हळू हळू तो ० होईल. अश्या वेळी लेजर ठेवणाऱ्या लोकांना काहीही फायदा होणार नाही आणि सध्याच्या बॅंक व्यवस्थे प्रमाणे त्यांना ट्रान्सक्शन फी ठेवावी लागेल.
अजून पर्यंत शोधून काढलेल्या बिटकॉईन्स ची संख्या.