Get it on Google Play
Download on the App Store

प्रास्ताविक

स्त्रीबीजाच्या मीलनापासून पासुन गर्भाशयातील गर्भाची वाढ ते नवीन बालकाचा जन्म तसेच नवीन मनुष्यप्राण्याची उत्पत्ती आणि वाढीबद्दलचे शिक्षण प्रजननविषयक शिक्षणात अंतर्भूत केले जाते. आजकाल बहुतेकवेळा लैंगिक संबधातून पसरणारे संसर्गजन्य रोग, अशा आजारांपासून स्वतःचा बचाव कसा करावा आणि कुटूंबनियोजनाच्या पद्धती यांचासुद्धा प्रजननविषयक शिक्षणात अंतर्भाव केला जातो.


अंशिक दृष्ट्या अप्रत्यक्ष स्वरूपात लैंगिकशिक्षणाची माहिती शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा आजकाल प्रयत्न होत असला तरी, असंख्य देशांमध्ये आणि राज्यांमध्ये हा विवाद्य मुद्दा मानला जातो. खास करून कोणत्या वयापासून लैंगिक शिक्षणाची सुरूवात करावी, किती आणि नेमकी कोणती माहिती दिली जावी, मानवी कामुकते संदर्भात आणि कामजीवना संदर्भात जसे की सुरक्षित कामजीवन, हस्तमैथून लैंगिक एथीक्स बद्दलचे विषय सामान्यतः चर्चेत असतात.


असंख्य देशात वर उल्लेखल्या प्रमाणे लैंगिंकशिक्षणाच्या स्वरूपावरून बरीच वादळी चर्चा होते. बालवयातील लैंगिक आकर्षणाबद्दल माहिती उपयोगी आहे का निरूपयोगी, निरोध इत्यादी कुटुंब नियोजनाच्या साधनांबद्दल माहिती, याचा विवाहबाह्य अपत्यसंभवावरील परिणाम, बालवयातील अपत्यसंभव आणि लैंगिक संबधांमुळे पसरणारे रोग इत्यादी बद्दल माहिती शालेय अभ्यासक्रमात असावी का आणि असली तर स्वरूप आणि किती याबद्दल चर्चा केली जाते. अमेरीकी संयुक्त संस्थाने आणि इंग्लड इत्यादी कन्झर्वेटीव्ह विचारसरणीच्या देशात लैंगिकसंबधातून पसरणारे संसर्गजन्या आजार आणि आणि बालव्यातील अपत्यसंभावाचे प्रमाण अधिक आढळते कारण त्यांचा भर लैंगिक संबधापासून दूर ठेवण्या परतेच लैंगिक शिक्षण देण्यावर आहे.


'एड्स' च्या आजारामुळे लैंगिकषिक्षणाच्या आवश्यकतेवर अधिक भर दिला जातो आहे. प्लान्ड पॅरेंट हाउस सारख्या काही आंतररास्ह्ट्रीय संस्था लोकसंख्येची वाढ रोखण्याकरिता आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने लैंगिक शिक्षण आवश्यक समजतात.