Get it on Google Play
Download on the App Store

संभोग

संभोग जीवशास्त्रीयदृष्ट्या अशी क्रिया आहे की ज्यात नराचे जननेंद्रिय मादीच्या जननमार्गात प्रवेश करते.[१]. मराठी भाषेत 'संभोग' ह्या शब्दाची ही प्रचलित व सर्वमान्य व्याख्या आहे. गेल्या काही दशकांत समलैंगिता हा विषय काही प्रमाणात खुलेपणाने बोलला जात असल्यामुळे, 'समलिंगी संभोग' अथवा 'समलिंगी समागम' हा शब्दप्रयोग काही प्रमाणात वापरला जाऊ लागला आहे.

संभोग म्हणजे पुरुष आपले लिंग स्त्रीच्या योनीत प्रवेशित करून आपले वीर्य योनीमध्ये स्खलीत करतो. वीर्य योनीत आत जाऊन गर्भधारणा होऊ शकते. अर्थांत हा योनी संभोग आहे. ह्याशिवाय पुरुष आणि स्त्री एकमेकांची गुप्तांगे तोंडात घेऊन सुद्धा मुखमैथुन करू शकतात. समलिंगी पुरुषांत पुरुष आपल्या साथीदाराच्या गुदद्वारांत घालून गुदसंभोग करतात तर समलिंगी स्त्रिया एकमेकांच्या योनी घासून समलिंगी समागम करतात. 

संभोग क्रिया मध्ये बहुतेक वेळा दोन स्टेप्स असतात. 

१. फोरप्ले (कामुक प्रणय)

ह्यांत दोन्ही व्यक्ती चुंबन घेतात, स्त्रियांचे स्तनात कुमुक भावना जागृत करण्याचे मज्जातंतू असतात. स्तनाना आणि विशेष करून स्तनाग्रांना उत्तेजित केल्याने शरीरांत ओक्सयटोसीन नावाचे एक रसायन तयार होते त्यामुळे स्त्री उत्तेजित होते. ह्याशिवाय योनीच्या वर क्लीटोरीस किंवा भगवत्री हा जो भाग असतो तो स्त्री साठी सर्वांत जास्त महत्वाचा असतो. त्याला बोटाने उत्तेजित करून सुद्धा स्त्रीला कामुक सुख दिले जाऊ शकते. 

२. संभोग

फोरप्ले द्वारे दोन्ही साथीदार उत्तेजित झाले कि प्रत्यक्षांत लिंग योनीत आंत टाकले जाऊ शकते. फोरप्ले मुले योनीत ओलसर पणा निर्माण होतो आणि हा ओलसरपणा संभोग सुखद बनवतो.