Android app on Google Play

 

इंटरव्ह्यूमध्ये यश प्राप्त करण्यासाठी

 नवरात्रीमध्ये एखाद्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या सुती आसनावर पूर्व दिशेला मुख करून बसा. समोर पिवळा कपडा अंथरून त्यावर 108 मण्यांची स्फटिकाची माळ ठेवून त्यावर केशर आणि अत्तर अर्पण करून पूजा करा.

पूजा झाल्यानंतर धूप-दीप दाखवून खालील मंत्राचा 31 वेळेस जप करावा. अशाप्रकारे 11 दिवस हा उपाय केल्यास माळ सिद्ध होईल. ही माळ धारण करून इंटरव्ह्यूला जावे. हा उपाय केल्याने इंटरव्ह्यूमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढेल.

मंत्र
*ऊँ ह्लीं वाग्वादिनी भगवती मम कार्य सिद्धि कुरु कुरु फट् स्वाहा।*