Android app on Google Play

 

कशि जांवू मी वृंदावना

 

कशि जांवू मी वृंदावना ।
मुरली वाजवी ग कान्हा ॥१॥

पैलतिरीं हरि वाजवी मुरली ।
नदी भरलीं यमुना ॥२॥

कांसे पीतांबर कस्तुरी टिळक ।
कुंडल शोभे काना ॥३॥

काय करू बाई कोणाला सांगूं ।
नामाची सांगड आणा ॥४॥

नंदाच्या हरिनें कौतुक केलें ।
जाणे अंतरिच्या खुणा ॥५॥

एका जनार्दनी मनी ह्मणा ।
देवमाहात्म्य कळे ना कोणा ॥६॥