नाईट वॉक
अमित आणि मेघना लग्नानंतर मेलर्बन येथे स्थायिक होतात. अमित एका कॉलेजमध्ये प्राध्यापक असतो. मेघनाचं घरापासून जवळच एका कंपनीमध्ये वेब डेव्हलपरचं काम काही महिन्यांनी बंद होतं. दोनचार महिने घरी बसल्यानंतर तिला नोकरी करण्याचा कंटाळा येतो. आता घरी बसून काय करायचं? तेव्हा तिला अमितच्या लहान बहिणीची, स्वातीची आठवण येते. मेघना आणि स्वाती लहानपणीच्या जिवलग मैत्रिणी होत्या. मेघनाच्या लग्नानंतर स्वातीने अचानकपणे तिच्याशी बोलणं बंद केलं होतं. जुन्या गोष्टी विसरुन तिने इथे येऊन आपलं शिक्षण पुर्ण करावं असं मेघनाला वाटतं. ती ही गोष्ट अमितला देखील सांगते. अमित लगेचच स्वातीला ऑस्ट्रेलियामध्ये बोलवून घेतो. विशेष म्हणजे स्वाती तिथे स्थायिक होण्यासाठी होकार देते.
कागदपत्रांची पुर्तता करुन काही महिन्यांतच स्वाती ऑस्ट्रेलियामध्ये येते. अमितने त्याच्याच कॉलेजमध्ये तिच्या अॅडमिशनची व्यवस्था केलेली असते. अमित त्या दोघींना मेलर्बन सफर करवतो, कॉलेज सुरु होण्याआधी तिघेही मनसोक्त धमाल करतात. या सर्व गोष्टींमध्ये स्वाती मेघनाबरोबर अगदी नॉर्मल वागते, जणू काही झालंच नाही. तिघेही एकमेकांसोबत आनंदात राहत होते. दरम्यान अमितला नवीन कोर्सच्या ट्रेनिंगसाठी दोन आठवडे सिडनीमध्ये जावं लागतं. त्याच्या राहण्याची व्यवस्था कॉलेज करत असल्याने तो मेघना आणि स्वातीला तिथे नेऊ शकत नव्हता. दोन आठवडे त्या दोघींची अमितबरोबर भेट होणार नसली तरी, त्या व्हॉट्सअॅप आणि स्काईपवर त्याच्या संपर्कात होत्या. स्वाती असल्याने मेघनाला घरी एकटं जानवणार नाही या विचाराने अमित सुखावला होता.
एकीकडे अमितची ट्रेनिंग सुरु असते तर,दुसरीकडे त्या दोघींची शॉपिंग, शॉपिंग कसलं? दोन दिवासांतच दोघी शॉपिंग करुन कंटाळतात.
असंच एका रात्री साधारण साडेअकरा वाजता सोफ्यावर बसून दोघी टी.व्ही बघत असतात. स्वाती हसतखेळत असल्याने मेघनाच्या मनात एक प्रश्न येतो. सगळं व्यवस्थीत असताना स्वातीने आपल्याशी अचानक बोलणं बंद का केलं याबाबत तिला स्वातीला विचारावंसं वाटतं. पण स्वाती तिच्याशी नॉर्मल बोलत आहे हे बघून ती स्वातीला काही विचारत नाही.
''आता पुढचे काही दिवस काय करायचं? सगळी शॉपिंग झाली आहे, अमितने सगळं फिरवलं देखील आहे. आहे त्या ठिकाणी परत परत जाण्यात मजा नाही. इथे असं काही आहे का, जिथे आपण कधी गेलो नाही?'' स्वाती विचारते.
''नाही. मला पण कंटाळा आल आहे. आता काय करावं हे मला देखील सुचत नाहीये.'' थोडा वेळ थांबून मेघना पुन्हा म्हणते, ''खरं सांगायचं तर कंटाळा म्हणन्यापेक्षा मला अमितची खुप आठवण येतेय. रोमॅंटिक नसला तरी नाही म्हणावं तेवढं प्रेम करतो तो माझ्यावर, मला वेळ न देता स्वतःचं काम करत बसला तरी चालेल, पण मला तो डोळ्यासमोर असला की बरं वाटतं.''
''त्याला स्काईपवर बोलव ना! बहूतेक तो आता त्याच्या रुममध्ये आराम करत असेल. मी किचनमध्ये जातेय, तुला खाण्यासाठी काही आणू का?'' मेघना नकारार्थी मान हलवते, ''ठिक आहे, माझ्यापूरता काही आहे का बघते मी.'' एवढं बोलत स्वाती किचनच्या दिशेने जाते आणि मेघना अमितला स्काईप कॉल करते. अमित व्हिडीओ कॉल रिसिव्ह करतो.
''कसा आहेस? तुझी खुप...'' मेघना बोलता बोलता थांबते, कारण अमित डिस्को पबमध्ये असतो.
''बोल ना! काय झालं?'' अमित सहजपणे विचारतो.
''तू डिस्कोमध्ये आहेस?'' मेघना विचारते.
''हो...'' अमितचा पुन्हा तोच स्वर, ''का? काय झालं?''
''तूझं तिथे काय काम आहे?'' मेघना आश्चर्याने पण जरा रागावत विचारते.
''इथे माझ्यासोबत अजून काही शिक्षक आले आहेत. सगळे म्हणाले, पबमध्ये जाऊ, म्हणून आलो. तुला नाही आवडलं का?'' अमित विचारतो.
''हो, मला आजिबात नाही आवडलं. इथे आम्हा दोघींना तुझी आठवण येतेय. तू नाहीस म्हणून काही करायची इच्छा होत नाहीये, आणि तू तिथे डिस्कोमध्ये एन्जॉये करतो आहेस?'' मेघनाचा आता मोठ्या आवाजात बोलत होती.
''अगं पण मी नेहमी नाही ना जात. आज मित्रांनी जास्तच आग्रह केला म्हणून इथे आलो, याआधी मी कधी डिस्कोमध्ये गेल्याचं तुला आठवतंय का?'' अमित म्हणतो आणि मेघना जरा वेळ गप्प बसते.
''इट्स ओके. तू एन्जॉय कर, सहज तुझी आठवण आली म्हणून कॉल केला होता.'' मेघना आता नॉर्मल आवाजात बोलत होती.
''नाही, तुझा राग अजून गेला नाहीये.'' अमित म्हणतो.
''नाही रे, तसं काही नाही. तूझं देखील बरोबरच आहे. तू नेहमी कुठे डिस्कोमध्ये जातोस? एकदा गेल्याने काय होतं? तू एन्जॉय कर आम्ही इथे एन्जॉय करतो.'' एवढं बोलून मेघना फोन ठेवते. तोवर स्वाती तिथे आलेली असते.
''तुला खरंच राग नाही आला का?'' स्वातीने किचनमधून बाहेर येत सगळं ऐकलं असतं. सोफ्यावर बसत ती मेघनाला विचारते.
''थोड्या वेळेसाठी आला होता. मग म्हटलं, तो नेहमी थोडीच डिस्कोमध्ये जातो.'' मेघना म्हणते. थोडा वेळ दोघी गप्प बसतात. कुठल्या विषयावर बोलावं हे दोघींना सुचत नव्हतं. विचार करता करता मेघनाला अचानक काहीतरी सुचतं आणि ती मोठ्याने म्हणते.
''स्वाती, तयारी कर. आपल्याला बाहेर जायचंय.''
''बाहेर? पण कुठे? ते पण इतक्या रात्री?'' स्वाती आश्चर्याने विचारते.
''अमित डिस्कोमध्ये जाऊ शकतो ना! मग आपण दोघी नाईट वॉक का नाही करू शकत?'' मेघना हसतच म्हणते.
''अरे हा. मस्त आयडीया आहे. त्या निमित्ताने इथली नाईटलाईफ बघता येईल.'' स्वाती लगेच तयारीला लागते.
ऑस्ट्रेलियामध्ये असल्याने दोघींना रात्री घराबाहेर जाताना कसलीही भिती वाटत नाही. सोसायटीमधून बाहेर निघाल्यावर बाहेर त्यांना बरीच माणसं नाईटलाईल एन्जॉय करताना दिसतात. दोघींसाठी हे नवं असतं. दोघी रात्रीच्या वेळेस एकत्र फिरत असल्याने अनेकांना ते एक लेस्बियन जोडपं वाटतं.
"अमित पबमध्ये गेला आहे ना! मग आपण सुद्धा पबमध्ये जाऊया का?" स्वाती मेघनाला विचारते.
"चांगली आयडिया आहे. चल, कुणाला तरी विचारू." मेघना म्हणते. याआधी दोघी इतक्या रात्रीच्या बाहेर निघाल्या नव्हत्या, ऑस्ट्रेलियामध्ये तरी नाहीच. पब शोधत चुकून त्या दोघी एका लेस्बियन नाईटक्लबमध्ये जातात, जिथे फक्त स्त्रियांनाच जाण्याची परवानगी असते.
शंभर ऑस्ट्रेलियन डॉलर भरुन दोघी आत प्रवेश करतात. प्रवेश केल्यानंतर मेघनाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. मोठ्या आवाजात तिथे डीजेवर गाणी वाजत असतात, डिम लाईटमध्ये बऱ्याच स्त्रीया अर्धनग्न होऊन नाचताना तिला दिसतात, काही स्त्रीया गप्पांमध्ये रंगलेल्या, तर काही बियर पीत असतात, अनेक लेस्बियन जोडपी नाचत किंवा एखादा कोपरा बघून एकमेकींच्या ओठांचं चुंबन घेत असतात. मेघनाला हे सगळं किळसवाणं वाटतं, स्वातीला घेऊन ती तिथून निघू लागते तेव्हा एक स्त्री तिला मध्येच अडवते.
''काय झालं. आलात आणि लगेच निघालात?''
''माफ करा, आम्ही चुकून इथे आलो.'' मेघना म्हणते.
''काही काळजी करु नका, तुम्हाला इथे अडवणारं कुणीही नाही. तुम्ही हवं ते करु शकता. माझं नाव जेसिका आहे. मी इथली सुपरवायझर आहे.'' जेसिका म्हणते.
''तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही जे समजत आहात त्या आम्ही नाही आहोत.'' मेघना म्हणते.
''हो, या माझ्या वहिनी आहेत. म्हणजे यांचं ज्याच्याशी लग्न झालंय त्याची मी बहीण आहे.'' स्वाती मध्येच म्हणते.
''मग? त्यात काय झालं? म्हणून तुम्ही संबंध ठेवायचे नाही असं नाही होत ना!'' जेसिका गंमतीत म्हणते.
''माफ करा, आम्ही त्या टाईपच्या नाही, आम्ही चांगल्या घरातून आलो आहोत.'' मेघना म्हणते.
''माफ करा, तुम्ही चुकीचे शब्द वापरत आहात. इथे ज्या स्त्रीया आल्या आहेत, त्या सर्वच्या सर्व चांगल्या घरातून आल्या आहेत. विश्वास नसेल तर तुम्ही माझ्यासोबत पाहिजे त्या मुलीजवळ चला. मी त्या मुलीची चैकशी करेन, तेव्हा ती काय बोलते हे तुम्हीच ठरवा.'' जेसिका म्हणते.
मेघनाला तिथे थांबायची इच्छा आजिबात नसते. तरी त्या स्त्रीच्या समाधानासाठी ती त्या नाईटक्लबमधून एक नजर फिरवते. एका ठिकाणी दहा-बारा मुली गप्पांमध्ये रंगलेल्या असतात. मेघना, स्वाती आणि जेसिका त्या मुलींजवळ जातात. आधी जेसिका त्यांच्याबरोबर वरवरच्या गप्पा मारते. मेघना आणि स्वाती सोबतच असतात, त्या मुलींच्या एकूणच बोलण्यावरुन त्या चांगल्या घरातील मुली होत्या हे त्यांना कळून चुकतं. आता त्यांच्याबरोबर बोलताना मेघनाला अवघडल्यासारखं वाटत नव्हतं. कारण त्या सगळ्याच मुली लेस्बियन नसतात. त्यांच्यापैकी काही एकमेकींच्या मैत्रिणी असतात. जेसिका तिथून निघून जाते. मेघनाच्या बाजूला असलेल्या दोन मुली बराच वेळेपासून एकमेकींच्या ओठांचं चुंबन घेत होत्या.
''आता तुला व्यवस्थीत जमतंय.''चुंबन घेऊन झाल्यानंतर त्यातली एक दुसरीला म्हणते.
''तुम्ही दोघी लेस्बियन कशा झाल्या?'' न रहावून स्वाती त्या दोघींना विचारते. तिचा प्रश्न ऐकूण सगळ्या हसू लागतात.
''काय झालं? मी काही चुकीचं बोलले का?'' स्वाती म्हणते.
''आम्ही लेस्बियन नाही आहोत. आम्ही दोघी बहिणी आहोत. मी तिला किस करायला शिकवत होते.'' त्या दोघींपैकी एक म्हणते.
आता मात्र मेघनासह स्वातीच्या पायाखालची जमीन सरकते. एकमेकींच्या ओठांचं चुंबन घेणाÚया त्या दोघी बहिणी आहेत, यावर त्या दोघींचा विश्वास बसत नव्हता. दोघींचा चेहरा सांगत होता की त्यांच्या मनात काय चाललं आहे. अॅना नावाची एक स्त्री त्यांच्याजवळ येते आणि म्हणते, ''बोला. काय झालं?'' मेघना अॅनाला घडलेला प्रकार सांगतेच पण आमच्या देशात असं काही होत नाही हे देखील आवर्जून सांगते.
''असं नसतं.'' अॅना म्हणते, ''त्या दोघींना एकमेकींचं चुंबन घ्यावसं वाटलं म्हणून त्यांनी चुंबन घेतलं. यात गैर काय? हे बघा की इथल्या स्त्रीया स्वतःच्या इच्छेने आपला जोडीदार निवडू शकतात. मग तो जोडीदार पुरुषच असला पाहिजे असंही त्यांच्यावर बंधन नाहीये. तुम्ही दोघीही भारतीय दिसत आहात. तुमच्या इथे या गोष्टी समजण्यापलीकडच्या आहेत. मी लेस्बियन नाही, पण मी त्यांचं समर्थन नक्की करते, कारण त्या नॉर्मल आहेत, फक्त त्यांनी आपला जोडीदार म्हणून स्त्रीची निवड केली आहे.''
''पण अशा गोष्टी करायच्याच का?'' मेघनाचा प्रतिप्रश्न.
''इथे प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य जगण्याचा पुर्ण अधिकार आहे. भावना मनात दाटून ठेवल्या की त्यांचं रुपांतर चुकीच्या गोष्टीमध्ये होतं. बलात्कार असेच होतात का? वासनेची भुक जेव्हा वाढते तेव्हा तावडीत सापडलेल्या व्यक्तीवर जबरदस्ती केली जाते. आम्ही ती परिस्थितीच येऊ देत नाही, जे काही आहे ते मोकळेपणाने बोला. दोघांची समंती असल्याशीवाय इथे कोणीही शरीरसंबंध ठेवत नाही. शरीरसंबंध सोडाच, कुणाला साधा धक्का देखील लागू देत नाही. लागलाच तर दहा वेळा त्याला आम्ही सॉरी बोलतो.''
''ते मी समजू शकते, पण स्त्रीने स्त्रीसोबत संबंध ठेवायचे?'' मेघना म्हणते.
''प्रेम आंधळं असतं, ते ठरवून केलं जात नाही. एकदा तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्तीसमोर व्यक्त होऊन बघा, आपले प्रेम व्यक्त करुन तर बघा.'' अॅना म्हणते.
''बघेन. सध्या माझे पती सिडनीला...'' मेघना आपलं वाक्य पुर्ण करणार इतक्यात स्वाती तिला स्वतःजवळ खेचते. मेघनाला काही कळण्याच्या आत स्वाती तिच्या ओठांचं चुंबन घेते. मेघनाला स्वातीच्या वागण्याचं आश्चर्य वाटतं, ती विरोध करु लागते. पण, स्वातीची पकड घट्ट असते. विरोध करता करता मेघना नकळत मेघनाचे डोळे बंद होतात आणि ती स्वातीला प्रतिसाद देते. दोघी एकमेकींच्या मिठीत सामावून जातात. अॅना देखील त्यांना त्रास न देता तिथून निघून जाते. बऱ्याच वेळानंतर स्वाती मेघनाला आपल्या मिठीतून सोडते. मेघना अलगत डोळे उघडते.
''हे काय होतं?'' मेघना गोंधळलेल्या स्वरात विचारते.
''काही नाही, सहजच.'' स्वाती नजर चुकवून म्हणते.
''नजर का चुकवतेस? तुला कळतंय का, आता तू काय केलंस ते? तू मला किस केलंस, मला म्हणजे तुझ्या वहिनीला किस केलंस तू. मला तुझं काही कळतच नाही. माझ्या लग्नानंतर तू अचानक माझ्याशी बोलणं बंद केलंस आणि आता डायरेक्ट हे?'' मेघना विचारते.
''तुला खरं ऐकायचंय?'' स्वाती म्हणते.
''हो... प्लीज, खुप बरं होईल.'' मेघना म्हणते.
''मला वाटलं नव्हतं की मी तुला आता किस करेन, पण अॅनाचं बोलणं ऐकलं आणि तुला किस करावंसं वाटलं. खरं हे नाहीये, तुला किस करण्याचं खरं कारण म्हणजे आय लव्ह यू.'' स्वाती म्हणते.
''काय? वेडी झालीस का?'' मेघना म्हणते.
''तुला नाही कळायचं ते, आपण लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहोत. मैत्रिणी म्हणन्यापेक्षा एकमेकींच्या इतक्या जिवलग होतो की एकमेकींशिवाय आपल्याला राहवत नव्हतं. तू बोलायची देखील, मी मुलगा असते तर माझ्याशी लग्न केलं असतस तू. लहानपणी सगळं किती छान वाटत होतं. मग योगायोगाने माझ्याच भावाबरोबर तुझं लग्न झालं. लग्नानंतर जेव्हा तो तुझा हात पकडायचा, तुला स्पर्श करायचा, तेव्हा मला कसंतरीच व्हायचं. तुला कोणीही हात लावू नये असं मला वाटायचं, अगदी अमीतने देखील तूला हात लावू नये असं मला वाटायचं. आणि तेव्हाच मला कळलं, मी तुझ्या प्रेमात पडले आहे. पण भावाच्या संसारात व्यत्यय नको म्हणून मी तुझ्याबरोबर बोलणं बंद केलं.'' एवढं बोलून स्वाती एकदम गप्प होते आणि तिथल्या लेडीज वेटरकडे बीयर मागते.
''हे सगळं तू माझ्याशी आधी डिस्कस का नाही केलंस?'' मेघना नम्र आवाजात स्वातीला विचारते.
''त्याने काय फरक पडला असता?'' स्वाती म्हणते.
''सांगू काय फरक पडला असता?'' एवढं बोलून आता मेघना स्वातीला आपल्याजवळ खेचून घेते आणि यावेळी ती स्वातीच्या ओठांचं चुंबन घेण्यास सुरुवात करते. यावेळी स्वाती दचकते.
''हे काय होतं?'' चुंबन घेऊन झाल्यावर स्वाती आश्चर्याने विचारते.
''हे म्हणजे माझंदेखील तुझ्यावर प्रेम होतं. पण आपण असं काही करु, हे कधी वाटलं नव्हतं.'' मेघना म्हणते.
''एकदा तरी बोलून बघायचं ना!'' स्वाती म्हणते.
''काय बोलणार? मघाशी अॅना काय म्हणाली ऐकलं नाहीस का? आपल्या देशात असं काही चालत नाही, आपल्या इथल्या लोकांची मानसिकता खुप वेगळी आहे. इथे मुली मुलींशी लग्न करतात तरी काही वाटत नाही, आणि आपल्या इथे आपल्यापेक्षा खालच्या जातीतल्यांशी लग्न केलं तरी वादळ उठतं. म्हणून मी गप्प राहिले.'' मेघना म्हणते.
''मग अमितसोबत लग्नाला होकार का दिला?'' स्वाती विचारते.
''आमच्या घरी मोठी माणसं सगळं ठरवतात. मला देखील तुझ्यासारखं शिकायचं होतं, पण घरातल्यांनी लग्नाला प्राधान्य दिलं.'' मेघना म्हणते.
''कसले आहेत गं तुझ्या घरातले.'' स्वाती रागात म्हणते.
''तसं नाही. त्यांना माझी काळजीच होती, आपल्या इथे मुलींवर बलात्कार कमी होतात का? रोज कॉलेजला जायचे तर घरी येईपर्यंत आईबाबांची धाकधूक असायची. मी घरी सुखरुप पोहोचले की त्यांच्या जीवात जीव यायचा. असं रोज चालायचं.'' मेघना म्हणते. स्वातीला मेघनाचं म्हणनं पटतं. थोडा वेळ दोघीही गप्प बसतात.
''तुझं अमितसोबत लग्न झालं आहे, आज झालं त्यासाठी सॉरी. आता परत असं काही करणार नाही. उगाच माझ्यामूळे तुमच्या संसारात अडथळा नको यायला.'' स्वाती म्हणते.
''हो. आणि मी देखील स्वतःवर ताबा ठेवेन. आपल्या प्रेमाचा चाप्टर इथेच बंद करुया, आणि यापूढे या गोष्टीवर चर्चा नको करायला.'' मेघना म्हणते.
''चाप्टर बंद कशाला करायचा?'' मध्येच अमितचा आवाज येतो, ''आता तर तुमच्या प्रेमाची खरी सरुवात झाली आहे.''
मेघना आणि स्वाती अवतीभोवती पाहतात. लेस्बियन नाईटक्लब असल्याने तो तिथे असनं शक्यच नव्हतं. त्यांना अॅनाच्या मोबाईलमध्ये अमित व्हिडीओ कॉलवर दिसतो.
''अमित दादा, सॉरी. प्लीज चुकीचा अर्थ काढू नकोस.'' ''अमित सॉरी, प्लीज मला चुकीचं समजू नकोस.'' दोघी अमितची माफी मागू लागतात.
''सॉरी वगैरे बोलू नका. तुम्हा दोघींचं संपुर्ण बोलणं मी ऐकलंय.अॅना माझ्याच कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे. मी मानसशास्त्राचा शिक्षक असल्याने तुम्हा दोघींच्या भावना समजू शकतो. काळजी करायचं कारण नाही. तुम्हा दोघींचं जर एकमेकींचर मनापासून प्रेम आहे, तर मी मध्ये कशाला येऊ? त्यात या देशातील माणसं तुम्हा दोघींच्या भावना समजतात. मी तुम्हा दोघींसाठी आनंदी आहे.'' अमित हसतच म्हणतो. त्याचं बोलणं सुरु असतं तोवर जेसिकासह बऱ्याच स्त्रिया त्यांच्याभोवती जमा झालेल्या असतात.
''मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. तुझ्यासारखा समजूतदार नवरा मिळाला याचा मला खुप आनंद होतोय.'' मेघना म्हणते.
''खरंच. तू इतका समजूतदार आहेस हे आम्हाला माहित नव्हतं. तू जगातला असा पहिला भाऊ आहेस, जो त्याच्या बहिणीचं आणि बायकोचं लग्न लावणार आहेस.'' स्वाती म्हणते.
''मी येईपर्यंत वाट बघा. आल्यावर इथल्या पध्दतीने तुमचं लग्न लागेल, याची जबाबदारी मी घेतो.'' अमितचं बोलनं ऐकून तिथे असलेल्या सगळ्या स्त्रीया टाळ्या वाजवू लागतात. 'यू आर अ गुड हसबन्ड', 'यु आर अमेझिंग', 'गॉड ब्लेस यू', 'वेल डिसिजन मॅन', 'वी आॅल प्राऊड ऑफ यू' तिथे उपस्थित सर्वांच्या तोंडून अमितसाठी कौतूक निघतं.
''तुम्हा सर्वांना मी माझ्या पत्नीच्या आणि बहिणीच्या लग्नामध्ये आमंत्रित करीत आहे. फक्त माझ्यासाठी एखादी मुलगी बघून ठेवा.'' एवढं बोलून कॉल डिस्कनेक्ट होतो.
नाईटक्लबमध्ये सगळे हसतात, नंतर सगळे मेघना आणि स्वातीला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतात. मेघना आणि स्वातीने विचार सुद्धा केला नव्हता की, एक नाईट वॉक त्यांना इतक्या जवळ आणेल. त्या दोघी डोळे बंद करुन एकमेकींच्या मिठीत सामावतात आणि नकळत त्यांच्या डोळ्यांमधून आनंदाश्रु बाहेर येतात.