एल्युमीनियम खिळा – रोमानिया
१९७४ मध्ये त्रानसिलवेनिया च्या मूर्स नदीमध्ये २०००० वर्षे प्राचीन मैस्तदन च्या हाडांच्या सोबत एक एल्युमिनिअम चा खिळा मिळाला होता. या खिळ्यावर ऑक्साईड चा १ मिलीमीटर मोठा थर चढलेला होता. विज्ञानिकांच्या मते खिळा ३०० ते ४०० वर्षे जुना आहे. लक्षात घेण्यासारखे आहे की एल्युमिनिअम नेहमी अन्य धातुंशी मिश्रित आढळून येतो, परंतु ४०० वर्ष प्राचीन असलेला हा खिळा शुद्ध एल्युमिनिअम पासून बनलेला आहे. वैज्ञानिकांना हे न सुटणारे कोडे आहे की १८०८ च्या आधी पर्यंत एल्युमिनिअम चा शोध लागलेला नव्हता. मग ४०० वर्षांपूर्वी शुद्ध एल्युमिनिअम कसे असू शकते?