दगडाची बाहुली
१८८९ मध्ये ईदाहो च्या नाम्पा मध्ये अचानक वैज्ञानिकांचे लक्ष वेधले गेले. कारण होते उत्खननाच्या दरम्याने मिळालेली दगडाची बाहुली. ती मानवाच्या हस्ते बनवलेली आहे. दगडाची ही बाहुली ३२० फूट खोल खोदकामाच्या दरम्याने मिळाली होती. ती पाहून त्या वेळी असा अंदाज लावण्यात आला की सृष्टीत मानव प्रजाती अस्तित्वात आल्यानंतर कदाचित ही बाहुली बनवली गेली असावी. अर्थात, पडद्यामागचे सत्य अजूनही एक रहस्यच आहे.