सहारा वाळवंटात मिळालेली दगडांनी बनलेली खगोल शास्त्रीय रचना
सहारा मधील सुदूर वाळवंटात असलेली दगडांची ही संरचना जगातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक आहे. १९७३ मध्ये पुरातत्व शास्त्रज्ञ पहिल्यांदा इथे पोचले होते. १९९८ मध्ये प्रोफेसर फ्रेड वैंडोर्फ यांच्या टीमने या संरचनेचे अध्ययन केले तेव्हा लक्षात आले की ही संरचना जवळ जवळ इ. स. पू. ६००० मध्ये बनवली गेली आहे. नाब्टा प्लाया मध्ये सापडलेल्या दगडांच्या रचनेवर संशोधन केल्यानंतर लक्षात आले आहे की ती खगोल शास्त्रीय आणि ज्योतिषाशी संबंधित आहे. प्रश्न असा उपस्थित होतो की एवढ्या वर्षांपूर्वी त्या लोकांनी एवढा विकास कसा केला होता? त्या काळात ते याचा वापर कसा करत असतील? आज देखील हे एक रहस्यच राहिले आहे.