चीनी मोजैक लाइन्स
चित्रात दिसणाऱ्या या विचित्र रेषा ४० डिग्री २७'२८.५६ उत्तर आणि ९३ डिग्री २३'२४.४२ पूर्व दिशेला पाहिल्या गेल्या आहेत. या विचित्र गोष्टीच्या बाबतीत जास्त माहिती उपलब्ध नाही. चीन मधूल गानसू शेंग च्या वाळवंटात ह्या रेषा बनलेल्या आहेत. इंग्रजी मध्ये याला चीनी मोजैक लाइन्स म्हटले जाते. काही आकडे सांगतात की या रेषा २००४ मध्ये काढण्यात आल्या होत्या. महत्त्वाची गोष्ट अशी की या रेषा मोगाओ च्या गुहेच्या जवळ बनवण्यात आल्या आहेत ज्याला विश्वाचा वारसा असण्याचा दर्जा प्राप्त आहे. मजेशीर गोष्ट अशी की हे पहाड खडबडीत असून सुद्धा दीर्घ काळापासून या रेषा अगदी सरळ आहेत.