सरकणारे दगड – डेथ व्हेली, कॅलिफोर्निया
कॅलिफोर्निया येथील डेथ व्हेली मध्ये काही दगडांचे आपणहून सरकणे नासा साठी देखील एक न सुटणारे कोडे आहे. रेसट्रेक प्लाया २.५ मैल उत्तर ते दक्षिण आणि १.२५ मैल पूर्व ते पश्चिम पर्यंत पूर्ण सपाट आहे. परंतु इथे पसरलेले दगड अपोआप सरकत राहतात. इथे असे सरकणारे १५० पेक्षा जास्त दगड आहेत. अर्थात, कोणीही त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी सरकताना पाहिलेले नाही. थंडीच्या दिवसांत हे दगड जवळ जवळ २५० मीटर्स पेक्षा जास्त सरकलेले आढळून येतात. १९७२ मध्ये या रहस्याची उकल करण्यासाठी वैज्ञानिकांची एक टीम तयार करण्यात आली. टीम ने दगडांच्या एका ग्रूपचे नामकरण करून त्यावर ७ वर्षे अध्ययन केले. केरिन नावाचा जवळ जवळ ३१७ किलो वजनाचा दगड त्या दरम्याने जराही हलला नाही. परंतु जेव्हा वैज्ञानिक काही वर्षांनी तिथे परत गेले, तेव्हा त्यांना केरिन १ किलोमीटर दूर सरकलेला आढळून आला. आता वैज्ञानिक असे मानतात की जोराच्या वेगाने वाहणारा वारा हेच या मागचे कारण आहे.