Get it on Google Play
Download on the App Store

न्याहारीचा आनंद

सकाळी लवकर उठलात तरच तुम्ही न्याहारीचा योग्य आणि पूर्ण आनंद लुटू शकता. न्याहारी हे दिवसभरातील सर्वांत आवश्यक भोजन आहे. न्याहारी शिवाय आपला देह धीम्या गतीने कार्य करतो आणि दुपारच्या जेवणापर्यंत आपण एवढे भुकेले असतो की काहीही अरबट - चरबट खाऊन पोट भरून घेतो, उदा. सामोसे, जिलबी, वडा, पोहे, भाजी इत्यादी. सकाळी चांगली भरपेट न्याहारी केल्यावर अशी वेळ येत नाही. याशिवाय चहा - कॉफीचे घुटके घेत वर्तमानपत्र वाचणे किंवा ऑफिस मध्ये कामाची सुरुवात करणे किती समाधानकारक असते!